ऊसतोड मजुराकडून पत्नीचा कोयत्याने खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

ताडकळस - महागाव (ता. पूर्णा) शिवारात गंगाखेड शुगर कारखान्याकडून ऊसतोडणीसाठी आलेल्या मजूर पती-पत्नीमध्ये गुरुवारी रात्री वाद झाला. त्यातून पतीने कोयत्याने वार करीत पत्नीचा खून केला. संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सागरबाई अशोक कांबळे (वय 40) असे खून झालेल्या महिलेचे, तर अशोक विश्वनाथ कांबळे असे संशयित पतीचे नाव आहे. हे जोडपे पिरंजी (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथील असून ऊसतोडणीसाठी गंगाखेड शुगर कारखान्याकडून महागाव शिवारातील मारोती मोहिते यांच्या शेतात आले होते. गुरुवारी दिवसभर ऊसतोडणी केल्यानंतर सायंकाळनंतर पती-पत्नी बाजूलाच सरपण आणण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला होता.
Web Title: Husband murder to wife crime

टॅग्स