लग्नानंतर अडीच महिन्यांतच पतीची रेल्वेखाली आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

औरंगाबाद - लग्नाला जेमतेम अडीच महिने झाले असताना पतीने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना 11 नोव्हेंबरला घडली होती. दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडल्यानंतर शनिवारी (ता. आठ) याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात पत्नीविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली. 

औरंगाबाद - लग्नाला जेमतेम अडीच महिने झाले असताना पतीने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना 11 नोव्हेंबरला घडली होती. दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडल्यानंतर शनिवारी (ता. आठ) याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात पत्नीविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अभय अरविंद देशमुख (वय 40) असे मृताचे नाव आहे. अभय एका खासगी कंपनीत नोकरीला होते. त्यांचे भाऊ अमोल हे गुजरातेत राहतात. अभय त्यांच्या आईसोबत सातारा परिसरात राहत होते. दोन वर्षांनी मोठ्या असलेल्या स्वाती हिच्याशी ऑगस्ट 2018 मध्ये त्यांचा विवाह झाला. अभय यांचे पहिले; तर स्वातीचा हा दुसरा विवाह होता; परंतु स्वाती व अभय यांच्या आईत वाद झाले. ती आईला बरे पाहत नसल्याने अभय निराशेच्या गर्तेत होते. स्वातीकडून होणाऱ्या नेहमीच्याच त्रासाला कंटाळून 10 नोव्हेंबरला अभय घरातून निघून गेले. ते परत न आल्याने त्यांच्या आईने सातारा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याबाबत तक्रार झाली. याबाबत नोंद झाल्यानंतर 11 नोव्हेंबरलाच अभय यांचा शिवाजीनगर रेल्वे गेटजवळ मृतदेह आढळला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. दरम्यान, मृत्युपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडल्यानंतर आत्महत्येचा प्रकार स्पष्ट झाला. पत्नीचा अभयला त्रास होता, अशी तक्रार त्यांचे भाऊ अमोल यांनी दिली. त्यानुसार, सातारा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. तपास उपनिरीक्षक सुशीला खरात करीत आहेत. 

आईला लिहिली होती चिठ्ठी 
"मी पत्नीच्या त्रासाला कंटाळून मला संपवत आहे. आई, मला माफ कर, ही विनंती,' असा आशय चिठ्ठीत होता. ही चिठ्ठी सापडल्यानंतर याबाबत अभय यांचे भाऊ अमोल यांनी पोलिसांना माहिती दिल्याचे उपनिरीक्षक सुशीला खरात यांनी सांगितले. 

Web Title: husband suicide under the train in aurangabad