औरंगाबाद : पतीला मिळाले पत्नीचे अश्लील फोटो-ऑडिओ; घोटला गळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

या प्रकरणी पतीला अटक केल्यानंतर त्याला आॅडिओ आणि फोटो देणाऱ्या दोघांना सोमवारी (ता. नऊ) सायंकाळी पोलिसांनी अटक केली.

औरंगाबाद - विवाहितेचे ऑडिओ रेकॉर्डिंग व तिचे आक्षेपार्ह फोटो तिच्या पतीला पाठवेल. त्यामुळे संतप्त होऊन पतीने तिचा गळा गळा घोटला. या प्रकरणी पतीला अटक केल्यानंतर त्याला आॅडिओ आणि फोटो देणाऱ्या दोघांना सोमवारी (ता. नऊ) सायंकाळी पोलिसांनी अटक केली. मंगेश गवळे (26, रा. त्रिवेणीनगर) व मनोज ऊर्फ मन्या थोरात (29, रा.
रामनगर) अशी त्या संशियताची नावे आहेत. 

मृत भारतीच्या (बदलले नाव) वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार लग्नाच्या काही दिवसांनंतर भारती- तिच्या पतीमध्ये सतत वाद होत होते. त्यामुळे ते दोघे मुंबई सोडून औरंगाबादमधील रामनगर येथे  किरायाने राहयाला आले होते. तिच्या पतीने वाळूज महानगरातील बजाजनगरात एक फ्लॅट खरेदी केला आहे. तेथे त्याची बहीण राहते. त्यावरून भारती आणि पतीमध्ये
नेहमी खटके उडायचे. त्यातच सहा सप्टेंबरला भारतीने वडिलांना फोन करून पती मारहाण करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे भारतीला वडिलांनी तिला माहेरी आणले. सात सप्टेंबर रोजी पतीने तिला पुन्हा रामनगर येथे घरी आणले. त्यानंतर दोघांमध्ये कडाक्‍याचे भांडण झाले. त्यातून पतीने गळा आवळून भारतीचा खून केला व तेथून पसार झाला. प्रकरणात मुकुंदवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला. 

ऑडिओ क्‍लिप व्हायरल 
भातीच्या खुनापूर्वी तिच्या पतीने तिची ऑडिओ क्‍लिप व तिचे आक्षेपार्ह फोटो नातेवाईक व इतरत्र पाठविले. सदर क्‍लिप व फोटोची तपासणी केली असता संशयित आरोपी मंगेश गवळे व मनोज थोरात या दोघांनी मृताच्या पतीला क्‍लिप व फोटो पाठवून चिथावणी दिल्याचे समोर आले. त्याआधारे पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband viewed wife's pornographic photos