esakal | लग्नाला जाताना भीषण अपघात; दुचाकीवरील पती-पत्नी ठार 
sakal

बोलून बातमी शोधा

Bokardan Accident News

विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमाला येत असताना दुचाकी व एसटी महामंडळाच्या बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात वालसावंगी येथील दांपत्य ठार झाले.

लग्नाला जाताना भीषण अपघात; दुचाकीवरील पती-पत्नी ठार 

sakal_logo
By
दीपक सोळंके

भोकरदन (जि.जालना) : विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमाला येत असताना दुचाकी व एसटी महामंडळाच्या बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात वालसावंगी येथील दांपत्य ठार झाले. ही घटना गुरुवारी (ता.सात) दुपारी तीन वाजेच्या सुमारास भोकरदन जवळील विरेगाव गावाजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील वालसावंगी येथील विष्णू त्रंबक गारुडी (वय ५५) व त्यांची पत्नी मंगलाबाई विष्णू गारुडी (वय ५०) हे दोघे भोकरदन येथे गुरुवारी एका विवाह सोहळ्यासाठी दुचाकीने येत असताना शहराजवळील विरेगाव गावाजवळ औरंगाबादहुन मलकापूरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

शहरांची नावं बदलून लोकांच्या आयुष्यात काय बदल झाले? - बाळासाहेब थोरात

या अपघातात पती, पत्नी दोघे गंभीररित्या जखमी झाले. दोघांवरही भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जालना येथील घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी घेऊन जात असताना पतीचा रस्त्यात तर पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या घटनेने वालसावंगी गावावर शोककळा पसरली आहे.

संपादन - गणेश पिटेकर 

loading image