esakal | हुश्श...सुटले बुवा एकदाचे...मुरुंब्यातील त्या 28 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मुरुंबा (ता. परभणी) या गावातील 800 कोंबड्यांचा अज्ञात रोगाने मृत्यु झाला होता. जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभागाने तात्काळ गावात धाव घेऊन उपायोजना करित पक्षांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते.

हुश्श...सुटले बुवा एकदाचे...मुरुंब्यातील त्या 28 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः मुरुंबा (ता. परभणी) येथील बर्ड प्लु मुळे 800 कोंबड्या मरण पावल्या. त्यामुळे गावासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. या कोंबड्याच्या कुकुटपालन केंद्रात काम करणारे कामगार व त्यांच्या संपर्कात आलेल्या 28 जणांचे स्वॅब घेवून त्यांना कॉरंन्टाईन करण्यात आले होते. परंतू या सर्व नागरीकांचे स्वॅब तापसणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे गावकऱ्यासह प्रशासनाचा जीव भांड्यात पडला आहे.

मुरुंबा (ता. परभणी) या गावातील 800 कोंबड्यांचा अज्ञात रोगाने मृत्यु झाला होता. जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभागाने तात्काळ गावात धाव घेऊन उपायोजना करित पक्षांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. तिथून हे स्वब भोपाळ येथे पाठवण्यात आले. ज्यांचा अहवाल  रविवारी (ता. 11)  रात्री उशिरा जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला. त्यात 'बर्ड फ्लू' मुळेच कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते.  यामुळे संपूर्ण जिल्हाभरात खळबळ उडाली होती.

हेही वाचासर्वोच्च न्यायालयाचे आभार मानत काँग्रेसचा नांदेडमध्ये जल्लोष
 

सर्वच्या सर्व 28 जणांचे स्वॅब अहवाल निगेटीव्ह आले

जिल्हा प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना म्हणून गावातील कुकुट पालन केंद्रात काम करणारे कामगार व त्यांच्या संपर्कातील इतर व्यक्तीचे स्वॅब तपासणीचे आदेश दिले होते. त्यावरून शनिवार, रविवार व सोमवारी या गावातील 28 ग्रामस्थांचे थ्रोट सॅंपल घेवून ते तपासणीसाठी पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. या तपासणीचा अहवाल मंगळवारी (ता.12) दुपारी आरोग्य विभागाकडे आला आहे. या अहवालात सर्वच्या सर्व 28 जणांचे स्वॅब अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांसह जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पशु संवर्धन विभागातील अधिकाऱ्यांचा जिव भांड्यात पडला आहे.

मांस विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानात स्वच्छता ठेवावी

दरम्यान, मंगळवारी सकाळपासून गावातील कुकुटपालन केंद्रातील कोंबड्यांना मारण्यासाठी प्रक्रिया सुरु होती. त्यासाठी गावालगत असणाऱ्या मोकळ्या जागेत मोठ मोठे खड्डे कऱण्याचे काम जेसीबी मशिनच्या सह्य्याने करण्यात आले. या तीन खड्यात या कोंबड्या पुरल्या जाणार आहेत. परभणी शहरातील मांस विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानात स्वच्छता ठेवावी यासाठी महापालिका आयुक्तांनी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार ज्या मांस विक्रेत्याच्या दुकानात स्वच्छता ठेवली जाणार नाही त्यावर कारवाई केली जाणार आहे. खरबदरीचा उपाय म्हणून हा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

" मुरुंबा गावातील त्या सर्व ग्रामस्थांचे थ्रोट सॅम्पल तपासणीसाठी पुण्याला पाठवले होते. त्याचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

- डॉ. शंकरराव देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी, परभणी

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top