esakal | मी भाजपमध्येच, भविष्यवाणी ठरवू नका! पंकजा मुंडे यांनी अफवा परविणाऱ्यांना फटकारले
sakal

बोलून बातमी शोधा

2pankaja_munde1_0

भाजपने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीला पक्षाचे राष्ट्रीय सचिवपद देऊन विश्वास टाकला. तो मी सार्थ ठरवेन, असे स्पष्ट करीत पंकजा मुंडे यांनी अफवा पसरविणाऱ्यांना फटकारले.

मी भाजपमध्येच, भविष्यवाणी ठरवू नका! पंकजा मुंडे यांनी अफवा परविणाऱ्यांना फटकारले

sakal_logo
By
प्रशांत बर्दापूरकर

अंबाजोगाई (जि. बीड) : मी शिवसेनेत जाणार की, आणखी कुठे जाणार? अशा अफवा पसरवून माझे हितचिंतक विनाकारण भविष्यवाणी करीत आहेत. त्यांनी माझे भविष्य ठरवू नये. भाजपने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीला पक्षाचे राष्ट्रीय सचिवपद देऊन विश्वास टाकला. तो मी सार्थ ठरवेन, असे स्पष्ट करीत पंकजा मुंडे यांनी अफवा पसरविणाऱ्यांना फटकारले.

ऊसतोड मजुरांच्या बैठकीला शरद पवारांना बोलवा, समन्वय संघर्ष समितीची भूमिका


अंबाजोगाई येथे शनिवारी (ता.२४) आमदार नमिता मुंदडा यांच्या यांच्या निवासस्थानी मुंडे यांचा सत्कार झाला. यावेळी त्या बोलत होत्या. मुंडे म्हणाल्या, कोरोनामुळे लोकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी मी स्वत:च घराबाहेर पडणे टाळले. याचा गैरार्थ काढून अफवा पसरविण्यात आल्या. कोरोनाच्या काळात एकही सत्ताधारी कोविड सेंटरकडे फिरकला नाही. अशा परिस्थितीत खासदार डॉ. प्रीतम मुंडे व अक्षय मुंदडा यांनी कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांच्या भेटी घेतल्या. दिलासाही दिला. तरीही माझ्याबद्दल अफवा का पसरविल्या जातात हेच मला समजत नाही.

आताही मी शिवसेनेत जाणार का कुठे जाणार? अशा अफवा पसरविल्या जात आहेत. माझ्या भविष्याची चिंता तुम्ही करू नका. मी स्वत: खंबीर आहे. माझ्या पक्षाने मला भरपूर दिले. तसेच गोपीनाथराव मुंडे यांची शिदोरी माझ्या पाठीशी भक्कम आहे, असे त्या म्हणाल्या. यावेळी आमदार मुंदडा, भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, अंबासाखरचे अध्यक्ष रमेशराव आडसकर, मोहन जगताप, राम कुलकर्णी, बाळासाहेब दोडतले, अक्षय मुंदडा, भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे आदी उपस्थित होते. वैजनाथ देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. संतोष लोमटे यांनी आभार मानले.

भाजपचे राजकारण नेहमीच दिशाभूल करणारे, प्रकाश आंबेडकर यांची टीका

ऊसतोड कामगारांना २१ रुपये दरवाढ द्या
ऊसतोड कामगारांना २१ रुपये दरवाढ द्या. भविष्यात या कामगारांचे होणारे नुकसान कसे भरून काढायचे हे मी पाहते. मात्र, त्यांना संकटात टाकणार नाही. दसरा होताच कोयते घेऊन ते कामावर निघतील. परंतु, त्यांना २१ रुपये दरवाढ द्या’’, अशी मागणीही मुंडे यांनी यावेळी केली.संपादन - गणेश पिटेकर

loading image