कृषी पर्यटनाने दिली कसाबखेड्याला वेगळी ओळख 

आदित्य वाघमारे 
सोमवार, 16 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

व्यापारी उलाढालीचा आणि टोलेजंग वाड्यांचा समृद्ध इतिहास असलेल्या कसाबखेड्याला कृषी पर्यटनाने नवी ओळख दिली आहे. साहसी खेळ आणि निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी कसाबखेड्याकडे पर्यटकांची पावले वळत आहेत. 

शहरालगत ऐतिहासिक बाजारपेठा म्हणून ख्याती असलेल्या कसाबखेड्याला कृषी पर्यटनाने नवी ओळख दिली आहे. 2011 या वर्षी आपल्या शेतीत एक आगळेवेगळे कृषी पर्यटन केंद्र थाटण्याचा निर्णय हरीश जाखेटे यांनी घेतला. त्यांच्या या संकल्पनेतून उभे राहिलेले कृषी पर्यटन केंद्र अनेक पर्यटकांना आकर्षित करणारे ठरले आहे. शेती कायम ठेवत त्यातच आधुनिक फार्म साकारून साहसी खेळ आणि त्याच्या साथीला निसर्गाबाबतची जागृती या गोष्टी नागरिकांना येथे परत येण्यासाठी खुणावतात. पर्यटकांच्या सेवेसाठी येथील स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले असून, यातून सुमारे चाळीस जणांना रोजगारही मिळाला आहे. सलग पडलेल्या दुष्काळात तग धरून राहिलेल्या या फार्मने अनेकांना रोजगार देण्याचे काम केले आहे. ग्रामीण भोजनाचा आस्वादासह येथे लावण्यात आलेल्या साहसी खेळांची संख्याही मोठी आहे. त्यात रॉक क्‍लाईम्बिंगग, बर्मा ब्रिज आणि अन्य खेळांचा समावेश करण्यात आला आहे. शेती आणि त्याचबरोबर असलेले पर्यटन साधारण 15 स्थानिक कुटुंबांना आणि दहा अन्य कुटुंबांना रोजगार देणारा हा प्रकल्प ठरला आहे. 

झिरो बजेट शेतीचे मार्गदर्शन 
शेती करताना रासायनिक खतांना फाटा देत शेण आणि गोमूत्राच्या साथीने करण्यात येणारा "झिरो बजेट शेती'चा प्रयोग जाखेटे आणि त्यांच्या साथीदारांनी यशस्वी केला आहे. हा प्रकल्प पाहण्याठी लांबवरून शेतकरी या ऍग्रो फार्ममध्ये येतात आणि त्यांना येथे याबाबात मार्गदर्शन करण्यात येते. यासह गांडूळ खत, अवजारांची माहिती येथे शेतकऱ्यांना मोफत देण्यात येते. 

सध्या व्हर्च्युअल गेम्सच्या जमान्यात प्रतेयकजण मोबाईल आणि टीव्हीवरील गेम्स खेळण्यात गुंतला आहे त्यांनी मैदानावर येऊन येथील खेळांचा आनंद घ्यावा आणि त्याच्या माध्यमातून सांघिक भावना जोपासावी, या उद्देशाने येथील खेळांना जागा देण्यात आली असल्याचे जाखेटे म्हणाले. याशिवाय येथे निसर्गाची आगळीवेगळी माहिती देणारे फलक येणाऱ्यांसाठी प्रबोधनाचे काम करतात, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: Identification of the different agricultural tourism