बीड जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावे कापूस विकल्यास कठोर कारवाई

दत्ता देशमुख
Tuesday, 15 December 2020

बीड जिल्ह्यातील कापूस खरेदी प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी कापसाची ऑनलाईन नोंद करण्यासाठी गुगल लिंक बाजार समित्यांना देण्यात आलेली आहे.

बीड : जिल्ह्यातील कापूस खरेदी प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी कापसाची ऑनलाईन नोंद करण्यासाठी गुगल लिंक बाजार समित्यांना देण्यात आलेली आहे. सदर गुगल लिंकवर शेतकऱ्यांना त्यांच्या विक्री योग्य कापसाची नोंदणी करण्यासाठी यापूर्वीची ३० नोव्हेंबरची मुदत आता १९ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावे कापूस विकल्याचे निदर्शनास आले तर कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. अशा कापसाचे देयक दिले जाणार नसून फौजदारी गुन्हेही नोंद करण्यात येतील.

 

बाजार समित्यांकडे कापूस नोंदणीसाठी कागदपत्रे जमा केलेल्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदीचे काम बाजार समित्यांचे स्तरावर सुरु आहे. परंतु जिल्ह्यातील बऱ्याच कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून नोंदणीसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार ज्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी अद्याप बाजार समितीकडे नोंद केलेली नाही त्यांनी १९ डिसेंबरपर्यंत नोंद करता येईल. शेतकऱ्यांच्या नावाने व्यापाऱ्यांनी कापूस विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास कापसाची रक्कम खरेदी केंद्राद्वारे अदा केली जाणार नाही, त्याप्रमाणे संबंधाविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असे जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस म्हणाले.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If Cotton Buy In Name Of Farmers Then Case Filed Beed News