सर्व निवडणुका एकाच वेळी घेतल्यास वाचतील 22 हजार कोटी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

बीड - निवडणूक आयोगाकडून पाच वर्षांमध्ये विविध प्रकारच्या मिळून जवळपास चार वेळा निवडणुका घेतल्या जातात. या सर्व निवडणुकांवर जवळपास 36 हजार कोटी रुपये खर्च होतात; मात्र या सर्व प्रकारच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्यास तब्बल 22 हजार कोटी रुपये वाचतील. त्यामुळे सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याची सूचना करणारा प्रस्ताव "फाईट अगेन्स्ट करप्शन थ्रू इलेक्‍टोरल रिफॉर्मस्‌'च्या (फॅक्‍टर) वतीने निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार असल्याचे फॅक्‍टरचे प्रमुख प्रवक्‍ते अरुणकुमार श्रीवास्तव यांनी सांगितले. 

बीड येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी (ता.27) दुपारी एक वाजता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी सामाजिक कार्यकर्त्या सुशीला मोराळे उपस्थित होत्या. 

अरुणकुमार श्रीवास्तव म्हणाले, की "फाईट अगेन्स्ट करप्शन थ्रू इलेक्‍टोरल रिफॉर्मस्‌'च्या वतीने निवडणूक प्रचारातील सुधारणेवर काम सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून लोकसभेच्या उमेदवाराला 70 लाख, तर विधानसभा उमेदवाराला 25 लाख रुपये खर्च करण्याची परवानगी आहे. मात्र, प्रत्यक्षात 10 कोटी रुपयांपेक्षा कमी खर्चात विधानसभा निवडणूक लढविली जात नाही, तर लोकसभा निवडणुकीसाठी त्यापेक्षाही जास्त खर्च येतो. त्यामुळे कोणत्याच पक्षाकडून गरीब उमेदवार निवडणूक लढवू शकत नाही. निवडणुकीत भ्रष्टाचारी नेता, भ्रष्ट अधिकारी, उद्योजक किंवा गुंड प्रवृत्तीचे लोक यांचाच भरणा असल्याचे दिसून येते. 

हे चित्र बदलण्यासाठी निवडणुकीवरील खर्च कमी झाला पाहिजे, त्यासाठी सर्व प्रकारच्या निवडणुका देशभरात एकाच वेळी घेतल्या जाव्यात, अशी सूचना निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे श्रीवास्तव म्हणाले. 

एकाच वेळी निवडणुका घेतल्या 22 हजार कोटींचा खर्च वाचणार आहे. या खर्चातून निवडणूक आयोगाने सर्व पक्षांच्या सर्व उमेदवारांना निवडणूक प्रचाराचे साहित्य खरेदी करून द्यावे, सर्वांना समान साहित्य आयोगाकडून उपलब्ध करून दिल्यास कोणीही उमेदवार पैशांच्या जोरावर मतदारांवर प्रभाव पाडू शकणार नाही. परिणामी सर्वसामान्य लोक; तसेच विकासाची दूरदृष्टी असणारे लोक राजकारणात येतील, असा आशावादही श्रीवास्तव यांनी व्यक्त केला. मतदान यंत्राऐवजी बॅलेट पेपरद्वारेच मतदान घ्यावे, समानतेच्या तत्त्वानेच निवडणुकीची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणीही श्रीवास्तव यांनी केली.

Web Title: If the elections will survive at the same time 22 thousand crore