टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सेवा समाप्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांवर नोकरी गमावण्याची वेळ येणार आहे. टीईटी उत्तीर्ण करण्यासाठी त्यांना 30 जून 2019 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे; अन्यथा त्यांची सेवा समाप्त करण्यात येणार आहे. याचा फटका हजारो शिक्षकांना बसण्याची शक्‍यता आहे. 

13 फेब्रुवारी 2013 नंतर खासगी शैक्षणिक संस्थांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक शाळेत शिक्षकपदावर नियुक्त केलेल्या अनेक शिक्षकांनी पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेली नव्हती. त्यांना 30 जून 2016 पासून पुढील तीन वर्षे मुदत दिली गेली. त्यामुळे या शिक्षकांना जून 2019 पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्‍यक आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या 13 फेब्रुवारी 2013 च्या निर्देशानुसार राज्यातील प्राथमिक शिक्षकपदासाठी टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे; परंतु पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची संख्या राज्यात दहा हजारांच्या आसपास आहे. वर्ष 2010 पासून या परीक्षा अनिवार्य करण्यात आल्या. त्यानंतर काही शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतल्याने मुदतवाढ दिली गेली; मात्र 2013 मध्ये पुन्हा आदेश काढून परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक केले गेले.

Web Title: If the TET does not pass, the service is terminated