आरक्षण नाही तर मतदान नाही; धनगर समाजाची भूमिका

महेश गायकवाड
सोमवार, 8 एप्रिल 2019

जालना : साठ वर्ष आघाडीच्या सरकारने झुलवत ठेवल्यानंतर गेल्या पाच वर्षात भाजपाने आश्‍वासन देऊन धनगर समाजाला फसवल आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत आरक्षण नाही तर मतदान नाही. अशी भूमिका धनगर समाजाने घेतली असून ही मोहिम प्रत्येक गावात राबविण्याची घोषणा जय मल्हार सेनेचे अध्यक्ष लहुजी शेवाळे आणि डाॅ. सुभाष माने यांनी  केली आहे. जालना जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची सोमवारी (ता. 8) जालना शहरात बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीस   मराठवाडा संघटक माणिकराव राऊत, विठ्ठल रांधवन, अलका शेजुळ, धनराज सातपुते, दत्ता कोल्हेसह आदींची उपस्थिती होती.

धनगर समाजाला अनुसूचीत जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी उभारण्यात आलेल्या लढ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सत्ताधाऱ्यांनी समाजाला गृहीत धरण आहे. लोकसभा निवडणुकीत एकाही राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यान आरक्षणाचा मुद्दा नाही. कुणीही त्यावर बोलत नाही. राजकीय पक्षांना आरक्षणावर बोलते करण्यासाठी ही मोहिम राबवण्याचा निर्णय राज्यस्‍तरीय बैठकीत घेण्यात आल्याचे सांगत निवडणुकीच्या काळात एखाद्या पक्षाने ठोस भुमीका घेतल्यास राज्य कार्यकारिणीच्या बैठक घेऊन अंतिम निर्णय घेऊ असे श्री शेवाळे यांनी या वेळी सांगितले. पुढील पंधरा दिवस प्रत्येक गावात आरक्षण नाही तर मतदान नाही हे अभियान राबविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले. 

जानकरांनी राजीनामा देऊन  रस्त्यावर उतरायला पाहीजे होतं
भाजपा सरकारने धनगर समाजाला अनुसूचीत जमातीचे आरक्षण देण्याचे दिलेले आश्‍वासन पाळले नाही. तरीही राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर लोकसभा निवडणुकीत युतीसोबत गेले. यावर विचारलेल्या प्रश्‍नावर शेवाळे यांनी जानकर यांनी राजीनामा देऊन आरक्षण लढ्यासाठी  रस्त्यावर उतरायला पाहीजे होते. अशी समाजाची भावना होती. मात्र, त्यांनी तसे न केल्यामुळे ते सत्तेसाठी लाचार आहे. असा अर्थ यातून निघत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.  

Web Title: If we dong get any reservation then we will not vote says Dhangar Community