दृढ निश्‍चय असेल, तर यश तुमचेच : सोमय मुंडे 

सुषेन जाधव
मंगळवार, 12 जून 2018

औरंगाबाद : आयुष्यात काहीही काम करताना, आपण ते का करत आहोत, याचे उत्तर शोधले तर काम सोपे होऊन उद्देश साध्य होते. त्यामुळे प्रत्येकाने का चे उत्तर शोधून वाटचाल करावी असे आवाहन प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी केले. 

इन समर युथ समिट 18 मध्ये सोमय मुंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाच आपल्या जिवनाची वाटचाल स्पष्ट करुन सांगीतली. तालुक्‍यात इंग्रजी शाळा नसल्याने साताऱ्याच्या सैनिकी शाळेत शिक्षण घेतले, शिक्षण घेतानाच जिवनाची वाटचाल निश्‍चित केली. एकदा जॉब मिळाल्यानंतर पुन्हा अभ्यास करणे अवघड असते, मात्र तेच धेय डोळ्यासमोर ठेवनू युपीएसटीचा अभ्यास करुन आयपीएस होण्याचे स्वप्त साकार केले. दृढ निश्‍चय असल्याने आयएएसची वाटचाल सुकर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काम करताना, समाधान असले पाहिजे, सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवता आले पाहिेजे असे त्यांनी सांगितले.

Web Title: If you have a firm determination, then susses will be your your