esakal | अबब! गावठी दारूच्या अड्ड्यांवर धाडी, ड्रमच्या ड्रम रसायने जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

अबब! गावठी दारूच्या अड्ड्यांवर धाडी, ड्रमच्या ड्रम रसायने जप्त

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा : तालुक्यातील थोरलीवाडी येथील अवैध गावठी दारू बनविण्याचा ठिकाणी छापा टाकुन दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करीत सहा आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला. तर गुंजोटी, कराळी, बिरुदेव मंदिर परिसर व शहरात कार्यवाही करत सहा हजारचा मुद्देमाल जप्त करीत पाच आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

धुलिवंदन, होळी व रंगपंचमी या सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी अवैध व्यावसायिकाविरुद्ध मोहिम सुरू केली आहे. मंगळवारी (ता.१०) पहाटे पाचच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने धडक कारवाई करत गावठी दारू, रसायन व अन्य साहित्य जप्त केले. 

थोरलीवाडी येथे गावठी दारू तयार करण्यात येते, याची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक माधवराव गुंडीले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक वैशाली धुळे, पोलिस उपनिरिक्षक अमोल  मालुसरे, पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार वाघ यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी छापा टाकला.

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

त्यात दारू बनविण्याचे रसायन असलेले १४ बॅरेल (त्यात अडीच हजार लिटर रसायन) शंभर लिटर दारू व दारू बनवण्याचा कच्चा माल असा एकूण एक लाख चाळीस हजार रुपयेचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी यशवंत खवडे, रायप्पा कोराळे, लक्ष्मण मिसाले, विठ्ठल पाटील, त्र्यंबक खवडे दत्तु खवडे यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान

उमरगा शहर, गुंजोटी, कराळी परिसरात छापे मारून सहा हजाराची दारू जप्त केले असून विठ्ठल थोरात, श्रीकांत मंडले, काशीनाथ मंडले, बाबु मोरे, संतोष तेलंग यांच्या विरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

कुठं सापडलं जळालेल्या अवस्थेतलं प्रेत...