अवैध वृक्षतोडीची वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांच्या ताब्यात

अवैध वृक्षतोडीची वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांच्या ताब्यात

अंबड (जालना) : घनसावंगी, कु.पिंपळगाव परिसरातून अवैध वृक्षतोड करून मालेगावकडे जाणारा टेम्पो अंबड पोलिसांनी पाठला करुन जप्त केला आहे. ही कार्यवाही काल (ता. 12) मध्यरात्री दीडच्या सुमारास करण्यात आली.

या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, काल अंबड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर हे रात्रीच्या गस्तीवर होते. यावेळी पारनेर रस्त्यावर MH 20 EG 9252 हा आयशर टेम्पो रोहिलागड मार्गे औरंगाबादकडे भरधाव वेगाने जात असताना पोलिसांनी थांबण्याचा इशार केला. मात्र चालकाने वेग वाढविला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला व पोलिस निरीक्षक नांदेडकर यांनी या टेम्पोचा रोहिलागडपर्यंत पाठलाग करुन अडविला. त्यानंतर चालकाची चौकशी केली असता, टेम्पोमध्ये अवैध वृक्षतोड केलेली लिंब, बाभूळ यासह इतर  झाडांचे लाकडे असल्याचे आढळून आले.  

आयशरचा चालक शेख शाहीद भिकन व जावेदखा फारूक खान यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता घनसावनगी, पिंपळगाव या परिसरातून अवैध तोडून केल्याची काबुली त्यांनी दिली. दरम्यान कायदेशीर कार्यवाही करुन पोलिसांनी मुद्देमाल वन विभागाच्या ताब्यात दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com