महावितरण अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या 

अनिलकुमार जमधडे
बुधवार, 23 जानेवारी 2019

औरंगाबाद : महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात "सकाळ'ने वृत्तमालिका प्रसिद्ध केली. कनिष्ठ दर्जाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणाने सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होत असल्याने महावितरणची "महा'घसरण होत असल्याचे यात उदाहरणांसह नमूद केले. याची दखल घेऊन सहव्यवस्थापकीय संचालकांनी अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांची तडकाफडकी बदली केली आहे. 

महावितरणच्या गलथान कारभाराच्या विरोधात "सकाळ'ने गेल्या सहा दिवसांपासून "महाघसरण' ही मालिका सुरू केली आहे. महावितरणच्या कार्यालयात नागरिकांना वाईट अनुभव येतात. कार्यालयात अधिकारी जागेवर राहत नाहीत, भेटलेच तर उद्धटपणे वर्तन करतात, क्षुल्लक कामांसाठी अनेक चकरा मारायला लावतात. याची दखल घेऊन सातव्या दिवशी प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी तडकाफडकी बदल्यांचा निर्णय घेतला.

त्यानुसार अधीक्षक अभियंता संजय सरग यांची बीड परिमंडळात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर बीड येथील बिभीषण निर्मल यांची औरंगाबादला बदली केली. त्याचप्रमाणे कार्यकारी अभियंता विभाग क्र. 1 अभिजित सिकनीस यांची कन्नडला बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर कन्नड येथील कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत यांना औरंगाबादेत आणण्यात आले आहे. महावितरणमध्ये झालेल्या या तडकाफडकी बदल्यामुळे खळबळ उडाली आहे. 

Web Title: immediate transfer of MSEB officers