अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने वडिलाने केला मुलाचा खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

सिल्लोड - अनैतिक संबंधांत अडसर ठरत असलेल्या मुलाचा जन्मदात्यानेच कुऱ्हाडीने डोक्‍यात वार करून खून केल्याची घटना केळगाव (ता. सिल्लोड) येथे शनिवारी (ता. १४) घडली. ही घटना मंगळवारी (ता. २४) पोलिसांच्या तपासात उघडकीस आली.

प्रभाकर दादाराव कोल्हे (वय ४२, रा. केळगाव, ता. सिल्लोड) हा शेतात असलेल्या वखारीमध्ये नेहमीप्रमाणे वडिलांसोबत झोपण्यासाठी गेला. शनिवारी (ता. १४) रात्री झोपेत असताना वडील दादाराव भाऊराव कोल्हे (वय ६५) याने निर्दयीपणे कुऱ्हाडीचे घाव घालून त्याचा खून करून वखारीजवळील शेणाच्या उकिरड्यात मृतदेह पुरला होता. 

त्यानंतर वडिलाने सकाळी गावात घरी जाऊन मुलगा शेतात झोपण्यासाठी आला नाही असे सांगत सर्वत्र शोधाशोध सुरू केली. गावकऱ्यांना घेऊन सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार रविवारी (ता. १५) नोंदविली. पोलिसांचा तपास सुरू असताना पोलिसांनी मृत व्यक्तीच्या मोबाईलचे स्थळ (लोकेशन) बघितले असता तो केळगाव शिवाराच्या बाहेर गेलाच नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी तो दररोज झोपत असलेल्या बखारीच्या ठिकाणी बारकाईने तपास केल्यानंतर ठिकठिकाणी रक्ताचे डाग, रक्ताने माखलेले कपडे व कुऱ्हाड आढळून आली. 

पोलिसांनी बापाची चौकशी केल्यानंतर अगोदर उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या बापाने नंतर खुनाची कबुली देत सुनेसोबत असलेल्या अनैतिक संबंधांमध्ये मुलगा अडसर ठरत असल्याचे सांगत त्याचा खून केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीस मंगळवारी रात्री अटक करून बुधवारी (ता. २५) सिल्लोड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीस तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, फौजदार संदीप सावळे, विष्णू पल्हाळ, विलास सोनवणे, विठ्ठल डोके, विकास नायसे, शांताराम सपकाळ यांनी केली.

Web Title: Immoral relationship murder crime