सकाळच्या बातमीचा परिणाम; पाण्याचा दर्जा सुधारला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

- पाण्याचा दर्जा सुधारला
- जलस्तर वाढला 
- विद्यापीठाच्या विहीरीने साथ दिल्याने मिळाली सुविधा 

 

औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जलतरण तलावाच्या करण्यात येत असलेली डोळेझाक "सकाळ'ने उजेडात आणली होती. त्यानंतर येथील पाण्याचा दर्जा सुधारण्यासाठी औषधांचा वापर केला जात असुन पाण्याची खोल गेलेली पातळीही सुधारली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जलतरण तलावाच्या दुरुस्तीसाठी विद्यापीठातर्फे कोट्यावधींचा खर्च केला गेला. 36 लाखांच्या पुढील हा खर्च असल्याने कुलपती तथा राज्यपालांची मंजुरी घेऊन हे काम करण्यात आले. मात्र त्यानंततर विभागाच्या कारभाऱ्यांनी या पुलाकडे डोळेझाक केल्याने येथील पाण्याचा दर्जा घसरला आणि नितळ ऐवजी पैसे भरुन पोहणाऱ्यांना हिरव्यागार पाण्यात पोहण्याची वेळ आली होती. विद्यापीठ प्रशासनाने पाणी देण्यासा नकार दिल्याने या तलावाच पोट "खपाटी' गेले होते. पाण्याची ही कमतरता आणि औषधांचा वापर न केल्याने पोहणाऱ्यांसाच्या स्वास्थ्याला झालेला धोका "सकाळ'ने उजेडात आणल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ क्रीडा विभाग प्रशासनातर्फे पाणी मिळवण्याच्या हालचाली सुरु झाल्या.

पाईपलाईन केलेली असताना एका विभागाच्या आडवणुकीने थांबलेला विहीरीचा जलपुरवठा सुरु झाला आणि जलवात पाण्याचा स्तर वाढु लागला. तलावात असलेली अंदाजे पंधरा लाख लिटर पाण्याची तूट बऱ्यापैकी भरुन निघाली असली तरी अद्यापही या तलावाला पाण्याची अवष्यकता आहे. हिरवे पाणी रोखण्यासाठी रसायनांचा वापर करुन फिल्टर सुरु करण्यात आले ज्यामुळे पाणी पुन्हा एकदा स्वच्छ झाले आहे.

Web Title: Impact of Sakal News Improve water quality