परभणीत पाणी पाऊच कंपन्यांवर छापे

महापालिका कार्यवाही
महापालिका कार्यवाही

परभणी :महापालिका पथकांनी बुधवारी (ता. २०) शहराच्या विविध भागात चार ठिकाणी छापे मारून पाणी पाऊचची दोनशे पोती जप्त केली, तसेच २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. यापुढे पाणी पाऊच आढळल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा आयुक्त रमेश पवार यांनी दिला आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्यात झालेल्या बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी प्लॅस्टिक बंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना पालिकेला दिल्या. प्रसंगी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने तत्काळ कारवाई सुरू केली आहे. त्यासाठी पथके गठित करण्यात आहेत. प्लॅस्टिक बंदी असतानादेखील पाणी पाऊचची विक्री मात्र, राजरोसपणे सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आयुक्त श्री. पवार यांनी पथकप्रमुख तथा स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड व विनय ठाकूर यांना आदेश दिले. त्यानुसार शहरातील गंगाखेड रोडवर असलेल्या ‘एक्वा फाईन पाणी पाऊच’ कंपनीवर छापा टाकण्यात आला.

या ठिकाणाहून जवळ असलेल्या ‘डॉल्फिन एक्वा’ या पाणी कंपनीवर देखील छापा टाकून त्यांच्याकडून एकूण दीडशे पोती पाणी पाऊच जप्त करण्यात आले आहेत. शिवाय त्यांना दहा हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला. याप्रमाणेच जुना मोंढा भागातील शेख इब्राहिम या पाणी विक्रेत्यावर छापा मारण्यात आला. येथून जवळच असलेल्या ताडकळसकर या देशी दारूच्या दुकानात छापा मारून तेथील पाणी पाऊचची ४५ पोती जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या पथकात शेख रफिक, शेख इस्माईल, कदम यांच्यासह अन्य दहा कर्मचारी सहभागी होते.

विभागीय आयुक्तांच्या आदेशानेच कार्यवाही
महापालिकेने यापूर्वीदेखील प्लॅस्टिक बंदीसाठी कार्यवाही करून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा साठा व दंड वसूल केला आहे. वर्षभरापूर्वी काही दुकानांना सीलदेखील लावले होते. परंतु, बहुतांश वेळा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिलेल्या आदेशावरूनच कार्यवाही करण्यात आली आहे. अनेक महिन्यांपासून ही कारवाई बंद होती. परंतु, श्री. केंद्रेकर यांनी आदेश देताच ती पुन्हा सुरू झाली.

 


स्थानिकांचा विरोध कारणीभूत
महापालिकेने स्वतःकारवाई सुरू केल्यास त्यास मोठ्याप्रमाणात विरोध होतो. अनेक हितचिंतक प्रशासनासह अधिकारी वर्गाला दमदाटी करतात व कारवाई बंद पाडतात. त्यामध्ये महापालिकेतील काही लोकप्रतिनिंधीचादेखील समावेश असतो. त्यामुळे सुरू झालेली कार्यवाही अनेक वेळा बंद पडलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com