बलात्कार करणाऱ्यास कारावास

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

परभणी : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधिश डी. व्ही. कश्यप यांच्या न्यायालयाने सात वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड ठोठावला. हा निर्णय ता. १३ नोव्हेंबर रोजी देण्यात आला.

परभणी : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधिश डी. व्ही. कश्यप यांच्या न्यायालयाने सात वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड ठोठावला. हा निर्णय ता. १३ नोव्हेंबर रोजी देण्यात आला.

पिडित मुलीचे आरोपी मुंजा जिजा भांगे (रा. निवळी बु. ता.जिंतूर) याने ता. ९ ऑगस्ट २०११ रोजी अपहरण केले होते. पिडित मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. तसेच त्याने तिला जिवे मारण्याची धमकी देखील दिली होती. या प्रकरणी बोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक एस. यु. पटवारी यांनी केला. यामध्ये सरकारपक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले.

या प्रकरणात साक्षीपुराव्या दरम्यान आरोपी मुंजा जिजा भांगे हा या प्रकरणात दोषी आढळल्याने अॅड. बी. बी. घटे यांनी युक्तीवाद केला. सदर आरोपीला ता. १३ नोव्हेंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायाधिश डी. व्ही. कश्यप यांनी सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व एक हजार दंड ठोठावला आहे. या प्रकरणात जिल्हा सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी पक्षातर्फे अॅड. बी. बी. घटने यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी सहायक पोलिस निरीक्षक एस. एम. कलटवाड व पोलिस निरिक्षक आर. पी. जाधव यांनी केली.

हे ही वाचा....
गंगाखेडला ‘एटीएम’ फोडण्याचा प्रयत्न

गंगाखेड : शहरातील गजानन व्यापार संकुल शनीवार बाजारासमोर असलेले महाराष्ट्र बँकेचे ‘एटीएम’ शनिवारी (ता.१६) पहाटे दोन वाजता चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील वर्दळीच्या भागात हे ‘एटीएम’ येते. चोरट्यांनी ‘एटीएम’ मशिनची तोडफोड करून प्रिंटर व समोरील दरवाजा तोडला. त्यांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न करीत एटीएमचे अंदाजे ८० हजार रूपयांचे नुकसान केल्याची फिर्याद इलेक्ट्रॉनिक पेमेंट सर्व्हिस प्रा. लिमिटेड कंपणीचे मॅनेजर अंकुश हुलेकर यांनी दिली. त्यावरून गंगाखेड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच गंगाखेड पोलिसांनी धाव घेतली. घटनास्थळी श्‍वान पथक व ठसे तज्ज्ञाना पाचारण करण्यात आले. पण श्वान ही माग काढू शकले नाही. या वेळी पोलिस निरीक्षक शेख यांच्यासह फौजदार सदानंद मेंडके यांनी भेट दिली.
.....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Imprisonment for rape