दुर्गम भागांतील रुग्णांना मिळणार अद्ययावत सेवा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

- जिल्ह्यात सात आरोग्य केंद्रांना एनएचआरएमची मंजुरी
- आवारातच उभी राहणार कर्मचाऱ्यांची निवासस्थाने

औरंगाबाद: जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्यसेवेची वानवा पाहता शहराकडे धावणाऱ्या गरजू रुग्णांची पळापळ आता थांबणार आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानच्या वतीने (एनआरएचएम) जिल्ह्यातील दुर्गम भागांत सात प्राथमिक अद्ययावत आरोग्य केंद्रांच्या उभारणीला मंजुरी मिळाली आहे.

सोयगाव तालुक्‍यातील सावळदबारा व जरंडी या दुर्गम भागांसह औरंगाबाद तालुक्‍यातील चौका, फुलंब्री तालुक्‍यातील पिंपळगाव, खुलताबाद तालुक्‍यातील बाजारसावंगी, गंगापूर तालुक्‍यातील सिद्धनाथ वडगाव, तर सिल्लोड तालुक्‍यातील भराडी येथील आरोग्य केंद्रांची दुरवस्था झाल्याने रुग्णांना शहराची वाट धरण्याशिवाय पर्याय नव्हता. आरोग्यसेवेचे आयुक्त व अभियानाच्या संचालकांनी दिलेल्या पत्रात या सात आरोग्य केंद्रांसाठी प्रकल्प अंमलबजावणी आराखड्याअंतर्गत 37.25 कोटींचा प्रस्ताव एनआरएचएममधून केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला होता. त्यातील पहिल्या टप्प्यात पाच कोटी 83 लाखांचा निधी 2018-19 साठी अंशतः मंजूर झाला आहे. या केंद्रावरील मनुष्यबळासाठी परिसरातच निवासस्थाने उभारण्याचे नियोजन प्रस्तावात असून, प्राथमिक आरोग्य केंद्रही अद्ययावत असेल. त्यामुळे रुग्ण, कर्मचाऱ्यांना सोयीचे होणार असल्याचे जिल्हा आरोग्य आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी सांगितले.

प्राथमिक आरोग्य केंद्र--- प्रकल्प किंमत---मंजूर निधी
चौका (ता. औरंगाबाद)-- 5.60 कोटी-------30 लाख
सावळदबारा (ता. सोयगाव)--- 5.60 कोटी---30 लाख
जरंडी (ता. सोयगाव)---- 4.95 कोटी ------1.12 कोटी
पिंपळगाव (ता. फुलंब्री)----5.60 कोटी -----30 लाख
भराडी (ता. सिल्लोड)---- 5.60 कोटी ------ 30 लाख
सिद्धनाथ वडगाव (ता. गंगापूर)---4.95 कोटी---1.26 कोटी
बाजारसावंगी (ता. खुलताबाद)---495---------2.24 कोटी

Web Title: Improved services to be available in Inaccessible areas