खासदार इम्तियाज म्हणतात, लागेल तेवढा निधी आणीन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

विकास कामांची गती वाढवावी आणि ज्या कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाची कामे केलेली आहे अशांवर कारवाई करण्याच्या सुचना देत लागेल तेवढा निधी शासनाकडून आणण्याची ग्वाही त्यांनी बैठकीत दिली. 

औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी (ता. आठ) जिल्ह्यातील बांधकामाच्या कामांचा आढावा घेतला. विकास कामांची गती वाढवावी आणि ज्या कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाची कामे केलेली आहे अशांवर कारवाई करण्याच्या सुचना देत लागेल तेवढा निधी शासनाकडून आणण्याची ग्वाही त्यांनी बैठकीत दिली. 

Aurangabad News
औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत खासदार इम्तियाज जलील यांच्यासह अधिकारी.

बैठकीत प्रामुख्याने केंद्रीय मार्ग निधी, नाबार्ड, अर्थसंकल्पिय कामे आणि अर्थसंकल्पिय इमारती या योजनांतर्गत येणाऱ्या रस्ते, पुल व इमारती विषयी तसेच तसेच व्दिवार्षिक देखभाल दुरुस्तीचे कामे, रस्ते व पुल परिक्षण दुरुस्ती विषयी व शासकीय निवासी आणि अनिवासी इमारती दुरुस्ती संबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच शहरातील आणि वैजापूर, कन्नड, गंगापूर व खुलताबाद येथील रस्त्याविषयी खासदार इम्तियाज जलील यांनी चर्चा करत दुरावस्था झालेल्या रस्तांची तात्काळ दुरुस्तीच्या सुचना त्यांनी दिल्या. 

शासकीय कार्यालय, कोर्ट व इमारतींच्या अवस्थेबाबत चर्चा केली आणि ज्या इमारतीमध्ये दुरुस्तीचे काम आहे ते लवकरात लवकर करावे आणि नविन इमारतीच्या प्रस्तावा विषयी चर्चा झाली. 

घाटीतील डॉक्‍टर रुग्णांची गैरसोय टाळा 

घाटीमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या दुरुस्तीची कामे तात्काळ करण्यात यावी जेणे करुन तेथे येणाऱ्या रुग्णांची व तेथे असलेल्या डॉक्‍टर, अधिकाऱ्यांची होणारी गैरसोय टाळता येईल आणि तेथील रस्त्यांचीही दुरुस्ती करण्यात यावी. अधीक्षक अभियंता सु.गो.देशपांडे, कार्यकारी अभियंता एस.एस.भगत, वाय. बी. कुलकर्णी, एन.बी.भंडे, ए. वाय. येरेकर, कदिर अहेमद, एस. बी. बिरारे आदींची यावेळी उपस्थिीती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Imtiyaz Jaleel reviewed PWD works in Aurangabad