esakal | हिंगोलीत एक मुल- तीस झाडे अभियानाची आॅनलाईन निसर्गाची शाळा सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

एक विद्यार्थी तीस झाडे

हिंगोलीत एक मुल- तीस झाडे अभियानाची आॅनलाईन निसर्गाची शाळा सुरु

sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : जिल्ह्यातील १४ वर्ष वयोगटाखालील मुला, मुलींसाठी एक मुल- तीस झाडे या अभियानातंर्गत आॅनलाईन निसर्गाची शाळा सुरु झाली आहे.

या शाळेत २८ मुला, मुलींनी प्रवेश घेतला आहे. प्रत्येक शनिवारी सायंकाळी पाच वाजता ही निसर्गाची शाळा झुम अँपवरवर भरली जाणार आहे. पुढील सहा दिवस कृती असेल. १४ वर्षाखालील मुले- मुली या शाळेत प्रवेश घेऊ शकतात.

हेही वाचा - पुयनी बु. येथे वीज पडून एका ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. दोन) एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

मुलांच्या अंगी निसर्गाची आवड निर्माण व्हावी. निसर्गाशी घट्ट नातं निर्माण करुन सदृढ आयुष्य त्यांनी जगावं. मुलांनी दिवसातील एक घंटा तरी निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचा उपभोग घ्यावा. अशी अनेक उद्देश या निसर्गाच्या शाळेच्या पाठीमागची आहेत. या निसर्ग शाळेत कृतियुक्त अभ्यासक्रम, अनेक संकल्पना आणि उपक्रम आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या आँनलाईन परीक्षा आणि प्रकल्प सुद्धा आहेत. चांगली कृती करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते योग्य सन्मानही होईल. या निसर्ग शाळेचे प्रमाणपत्रही मिळणार आहे. लहान मुले हीच निसर्गाचे जतन करू शकतात. निसर्गाचे कृतिशील शिक्षणच पुढील काळात आपणाला तारु शकेल; अशी एक मुल तीस झाडे अभियानाची धारणा असल्यामुळे ही निसर्गाची शाळा' सुरू करण्यात आली आहे. या निसर्ग शाळेचे आँनलाईन उद्घाटन कवी प्रेमानंद शिंदे यांच्या हस्ते झाले. खंडेराव सरनाईक, अँड. राजा कदम, प्रा. ज्ञानोबा ढगे, प्रा. संजय मुसळे, प्रा. गुलाब भोयर, भगवान दुधाटे, पुंडलीक कौशल्य यांच्यासह प्रवेश घेतलेली मुले सहभागी होती. यावेळी या अभियानाचे प्रमुख आण्णा जगताप यांनी मार्गदर्शन केले. या निसर्गाच्या शाळेत आपल्याही पाल्याला दाखल करण्यासाठी एक मुल- तीस झाडे अभियानाशी संपर्क करा. प्रवेश मोफत असेल, झाडांच्या फळं, फुलं, आॅक्सीजनसारखा असे आवाहन श्री. जगताप यांनी केले आहे.

मुलांच्या अंगी निसर्गाची आवड निर्माण व्हावी. निसर्गाशी घट्ट नातं निर्माण करून सदृढ आयुष्य त्यांनी जगावं. मुलांनी दिवसातील एक घंटा तरी निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचा उपभोग घ्यावा यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.

- आण्णा जगताप, अभियान प्रमुख.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image