हिंगोलीत अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीनमधून 46 हजार रुपये केले लंपास

हिंगोलीत अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीनमधून 46 हजार रुपये केले लंपास
e sakal
Summary

हे तीनही एटीएम नेहमी गजबजलेली असतात.

हिंगोली : शहरातील देवडानगर, शिवाजी नगर येथील चित्रा कलर लॅब व नवा मोंढा या तीन ठिकाणी असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये छेडछाड करून अज्ञात दोन ते तीन चोरट्यांनी ४६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्या प्रकरणी शनिवारी (ता. १९) शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. (in hingoli, some thieves have stolen money from ATM machine)

हिंगोलीत अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीनमधून 46 हजार रुपये केले लंपास
कोरोनाला ‘परिवर्तन एक्सप्रेस’ लावणार ब्रेक

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील देवडानगर, शिवाजी नगर भागातील चित्रा कलर लॅब व नवा मोंढा भागात एसबीआय बँकेचे एटीएम आहेत. हे तीनही एटीएम मुख्य रस्त्यावर असल्याने नागरिकांना पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. हे तीनही एटीएम नेहमी गजबजलेली असतात.

हिंगोलीत अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीनमधून 46 हजार रुपये केले लंपास
हिंंगोलीत कोरोना लसीकरणाच्या जनजागृतीसाठी परिवर्तन एक्सप्रेस सज्ज

दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास या तीन्ही ठिकाणच्या एटीएममध्ये प्रवेश केला. तसेच एटीएम मशीनला छेडछाड करून तीन्ही मशीन मध्ये असलेल्या पैशातील ४६ हजार ५०० रुपये काढून घेऊन चोरून नेले. या बाबत अंकुश हुलेकर (रा.टाकळी कुंभकर्ण) जि. परभणी यांनी शनिवारी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्री. जाधव करीत आहेत.

हिंगोलीत अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीनमधून 46 हजार रुपये केले लंपास
हिंगोली नगरपरिषदेच्या नवीन तीन प्रकल्पास शासनाची मंजूरी

दरम्यान, शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या या एटीएस मधून पैसे लंपास केल्याच्या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे. मुख्य रस्त्यावर असलेल्या या तीनही एटीएम मधून एकाच दिवशी अज्ञात चोरट्यांनी रक्कम पळविली असल्याने शहरात चोरटे सक्रिय झाल्याची चर्चा नागरिकातुन केली जात आहे. (in hingoli, some thieves have stolen money from ATM machine)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com