उमरग्यात शंभर खाटांचे कोवीड केअर सेंटर कार्यान्वित 

umarga ccc.jpg
umarga ccc.jpg

उमरगा : जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी शुक्रवारी (ता.१४) सायंकाळी शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट देऊन आढावा घेतला. दरम्यान शहरातील मिनाक्षी मंगल कार्यालयातील कोरोना केअर सेंटरचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  
यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास पाटील, अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.अशोक बडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास साळूंके, नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश आष्टे, माजी सदस्य दिलीप भालेराव, किरण गायकवाड, शाहुराज माने, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम आदींची उपस्थिती होती.

या वेळी पालकमंत्री श्री. गडाख यांनी मीनाक्षी मंगल कार्यालयातील शंभर बेड (सीसीसी) सेंटरची पाहणी करून अधिकारी व मंगल कार्यालय प्रमुख अभय शिंदे यांच्याशी चर्चा केली. बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृह, आणि ईदगाह येथील कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या सोयी, सुविधाची पालकमंत्र्यांनी पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या. दरम्यान मुस्लीम युवकांनी पुढाकार घेऊन ईदगाह फंक्शन हॉल येथे उभारलेल्या कोरोना केअर सेंटरची पाहणी करून युवकांच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी खाजा मुजावर, बाबा औटी, बाबा जाफरी, जाहेद मुल्ला, कलिम पठाण, अतिक मुन्शी आदींची उपस्थिती होती.

प्रशासनाच्या कामाचे कौतुक 
उमरगा येथील प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधींनी समन्वयातुन कोरोनाच्या उपाययोजनांसाठी चांगले काम केल्याची माहिती खासदार ओमराजे यांनी सर्वासमक्ष पालकमंत्री श्री. गडाख यांना दिली. लोकप्रतिनिधींकडून कौतुकाची थाप प्रशासनाला मिळाली असली तरी सद्या वाढत्या प्रादुर्भावावर प्रभावी उपाय योजनेत असलेल्या कांही त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न हवेत, तरच तालुका कोरोनामूक्तीच्या दिशेने जाईल.

संपादन-प्रताप अवचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com