

बीड: बीड जिल्हा रुग्णालयात एका २४ वर्षीय महिलेचा प्रसूतीनंतर तासाभरात रक्तस्रावाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत असून याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. संजय राऊत यांनी सांगितले आहे.