एकाच दिवशी सहा घरफोड्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

अहमदपूर तालुक्‍यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या केंद्रेवाडी येथे एकाच दिवशी सहा घरफोड्या झाल्या आहेत. 

अहमदपूर(जि. लातूर) ः तालुक्‍यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या केंद्रेवाडी येथे एकाच दिवशी सहा घरफोड्या झाल्या आहेत. 

जवळपास एकशे पन्नास घरे असलेल्या केंद्रेवाडी येथे शनिवारी (ता.21) रात्री बारा ते दीडच्या दरम्यान गावात सहा घरांचे कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी जवळपास सहा लाखांचा ऐवज लांबवला.

विश्वंभर ज्ञानोबा केंद्रे यांच्या घरातील चार तोळे सोने आणि सोयाबीन विक्रीतून आणलेले 60,000 हजार रोख, दत्तात्रय पाटलोबा केंद्रे यांच्या घरातील पाच तोळे सोने व दहा हजार रोख, मनोहर श्रीरंग केंद्रे यांचे दोन तोळे सोने, विश्वनाथ एकनाथ केंद्रे यांच्या घरातील एक तोळे सोने आणि पाच हजार रोख, अशोक पंढरी केंद्रे यांच्या घरातील दोन तोळे सोने आणि पाचशे रुपये रोख तर यशवंत नारायण केंद्रे यांच्या घरातून मात्र ऐवज चोरला नाही.

शेती व्यवसाय असलेल्या या सहा कुटुंबातील एकूण 76 हजार रोख आणि चौदा तोळे सोने चोरीला गेले आहे. एकाच रात्री सहा घरे फोडल्याने नागरिकांत घबराट पसरली असून, या घटनेचा किनगाव पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. 

याबाबत उपसरपंच श्रीधर केंद्रे म्हणाले, की एकाच रात्रीतून सहा घरे फोडल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. रात्री दोननंतर घर फोडल्याचे निदर्शनास आले आहे. सदरील घटनेचा तपास लवकर व्हावा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: incidents of theft in ahmadpur taluka