हिंगोलीत पाच व्यापाऱ्यांवर प्राप्तिकराच्या धाडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

औरंगाबाद - केंद्र सरकारने काळ्या पैशाच्या विरोधात सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत इन्कम डिक्‍लेरेशन स्कीम, नोटाबंदीनंतर आता ऑपरेशन क्‍लीन मनीला सुरवात झाली आहे. काळा पैसा बॅंकेत जमा केलेले मराठवाड्यातील चारशे संशयित प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. गेल्या आठवड्यात ठिकठिकाणी केलेल्या कारवाईनंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी हिंगोलीतील पाच व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाने कारवाई केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन क्‍लीन मनीअंतर्गत चारशे संशयित खातेधारकांनी बॅंकांच्या खात्यात जमा केलेल्या पैशांचा हिशेब समाधानकारक दिलेला नाही. या चारशे जणांची यादी विभागीय आयकर आयुक्‍तालय कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे. त्यामुळे एक मार्चपासूनच या चारशे जणांवर टप्प्याटप्प्याने कारवाई सुरू करण्यात आली. आतापर्यंत मराठवाड्यातील 30 ते 35 संशयित खातेधारकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये कोचिंग क्‍लासेस, चार्टर्ड अकाउंटंट आणि व्यापाऱ्यांचा समावेश आहे. सोमवारी (ता. सहा) दुपारी वसमत व हिंगोलीतील एकूण पाच व्यापाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली. यामध्ये त्यांचे व्यवहार तपासण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने कारवाईचा आकडा समजू शकला नाही.

Web Title: income tax raid on businessman