बीड : कोळवाडीत डेंगीचे पन्नास रूग्ण

Dengue
Dengue

शिरूर कासार, जि. बीड : शिरूर कासार जवळील येथे साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. आज मितीला कोळवाडीमधील सुमारे चाळीस ते पन्नास रूग्नावर वेगवेगळ्या ठिकाणी खाजगी रूग्णालय उपचार सुरू आहे. दररोज रूग्णाच्या संख्येत भर पडत असल्याने गावकरयात घबराट पसरली आहे. 

शिरूर कासार तालुक्यातील बहूतांश गावात साथीच्या आजाराने लोक त्रस्त आहेत. कोळवाडी येथे तर प्रत्येक घरात दोन -तीन रूग्णांना डेंगी व अन्य साथीच्या आजाराची लागण झाली आहे. सध्या शिरूर कासार, बीड, नगर व अन्य ठिकाणी मिळून सुमारे 45 ते 50 रूग्णांवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून येथे साथीचे आजार असताना व आरोग्य विभागाला याची कल्पना दिलेली असताना आरोग्य विभागाचे कर्मचारी मात्र गावात फिरकलेच नाही आणि कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत. पंचायत समिती व जिल्हा परिषद स्थरावरही दखल घेतली जात नसल्याने आणि रूग्णांच्या संख्येत वरचेवर भर पडत असल्याने कोळवाडीच्या गावकरयात घबराट पसरली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून येथे येऊन कोणीही साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाने तातडीने दखल घेऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी बापू मानकर, सुभाष यमपुरे, रावसाहेब जायभाये, नारायण मानकर, दादा पवार, सखाराम गायकवाड आदीसह गावकरयानी केली आहे.

आरोग्य विभागाने दखल घेतली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या भागात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोक ऊसतोडणीला गेले असताना गावी राहिलेल्याना डेंगी झाल्याने काहींना कारखान्यावरून घर छापावे लागले आहे. 

दुष्काळात तेरावा महिना 
शिरूर कासार (जि. बीड) तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. खरीपाचे पीक आले नाही. रब्बीची पेरणी नाही. या भागात सर्वाधिक कापसाचे पीक घेतले जाते. मात्र यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे कापसाच्या उत्पादनात सात ते सत्तर टक्के घट झाली आहे. त्यामुळे सामान्य शेतकरयाची आर्थिक परिस्थिती ढासळलेली असताना डेंग्यु व अन्य साथीचे आजारामुळे आर्थिक भुर्दड सोसावा लागत असून ही साथ म्हणजे दुष्काळात तेरावा महिना म्हणावा लागत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com