लोकशाहीच्या परीक्षेत यंदा डिस्टींक्शनच !

latur
latur

लातूर : लोकसभा मतदारसंघात मागील दोन निवडणुकांतील मतदानाची टक्केवारी पहाता लोकशाहीच्या परीक्षेत आधी सेकंडक्लास अन् त्यानंतर फस्टक्लास मिळाला. आता 75 ते ऐंशी टक्केवारी गाठून मतदानात डिस्टींक्शन मिळवण्याचा निर्धार  गुरूवारी (ता. 14) मतदार जागृती प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला आहे. हा निर्धार तडीस नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नवनवीन कल्पनांचा पाऊस पाडला. यातूनच पुढे आलेली `मिशन डिस्टींक्शन` ही कल्पना स्वीकारत श्रीकांत यांनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.  

मतदारसंघात 18 एप्रिल रोजी मतदान असून निवडणूकीत मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी श्रीकांत यांनी पुढाकार घेतला आहे. सन 2009 च्या निवडणूकीत 54 तर 2014 च्या निवडणुकीत 62 टक्के मतदान झाले होते. आता 75 ते 80 टक्के मतदान होण्यासाठी मतदार जागृतीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जाणार आहे. गुरूवारच्या प्रशिक्षणात श्रीकांत यांनी प्रभावी मतदार जागृतीसाठी नवनवीन कल्पना तयार करून त्याचे सादरीकरण करण्याचे आवाहन अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आठ गट तयार करण्यात आले. प्रत्येक गटात दहा अधिकारी व कर्मचारी होते. सर्वांनी काही वेळातच ऐंशी ते शंभर कल्पना मांडल्या व त्याचे सादरीकरण केले. कल्पना ऐकून श्रीकांत भारावून गेले व त्यांनी या कल्पना मतदार जागृती कार्यक्रमात प्रत्यक्षात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. कल्पना मांडलेल्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचा त्यांनी पुस्तक देऊन सत्कार केला.     

मतदान केले असेल तरच या!
कल्पनांच्या वेगळेपणानुसार आठ गटांना जयहिंद, व्हीव्हीपॅट, मी मतदार - मी देश घडविणार, दिव्यांग मतदान क्रांती, उत्सव लोकशाहीचा, मिशन 18 एप्रिल, मिशन डिस्टींक्शन  व जागर लोकशाहीचा असे नावे देण्यात आली आहेत. यात समाजातील सर्व घटकांचा उपयोग करून घरोघरी जाऊन मतदारांचे प्रबोधन करण्याच्या कल्पना आहेत. एसटीच्या वाहकापासून मतदारांचा संपर्क येणाऱ्या सर्वांना त्यासाठी तयार करण्याच्या कल्पना आहेत. मतदान केले असेल तरच बसमध्ये या, असे आवाहनही एसटीच्या वाहकाकडून मतदारांना करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com