लातूर पाठोपाठ उदगीरमध्ये वाढले प्रदूषण

Increased pollution in Udgir
Increased pollution in Udgir

उदगीर  (जि. लातूर) - देशातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये दिसून आलेल्या प्रदुषणाची धोक्‍याची-घंटा उदगीर शहरात ही वाजण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना सतर्क राहावे लागणार आहे. 

उदगीर शहर हे कर्नाटक तेलंगणाच्या सीमाभागातील सीमेवर आहे. या शहरांमध्ये उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर स्थापण्यात आलेले आहेत. शिवाय शहरातील वाहनधारक मोठ्या प्रमाणावर आहेत. वाहनांची संख्याही प्रचंड वाढल्याने प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसून येते. उदगीर शहरात सकाळच्या वेळी मोठ्याप्रमाणावर धुरासारखे प्रदूषणाचे छत दिसून येत आहे. सकाळच्या
वेळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना दिसून येत आहे.

दिल्ली-मुंबई प्रमाणे आता उदगीर सारख्या शहरांमध्येही प्रदूषण प्राकर्षाने दिसून येत आहे. दरम्यान याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याचा धोका निर्माण झाला आहे.  उदगीर शहरात ऑटो रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुदत संपलेल्या व परवाना नसलेल्या या वाहतुकीवरही निर्माण होत आहे. अनेक ऑटोरिक्षा हे धोकादायक असूनही ते रस्त्यावर बिनदिक्कतपणे फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्या ऑटोमधून प्रचंड प्रमाणात कार्बन बाहेर पडत आहे. 

उदगीर शहरालगत असलेल्या एमआयडीसी व शहरातील नळेगाव रोड व बिदर रोडवर असलेल्या दोन सोयाबीन प्रक्रिया उद्योगातुन प्रचंड प्रमाणावर प्रदूषण होत असल्याने त्याचा परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. या उद्योगांतर्फे प्रदूषणासाठी आवश्‍यक असलेली काळजी घेण्यात आल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. 

उदगीर शहरात निर्माण होत असलेले वायु प्रदूषण हे नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक आहेच. परंतु, बालकांच्या आरोग्यासाठी हे खूप घातक आहे. बालकांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने प्रदूषणाचा परिणाम तातडीने बालकावर होऊन कान, नाक, घशाचे आजार होतात. त्यामुळे याचा वेळीच बंदोबस्त होणं आवश्‍यक आहे. 
- डॉ. महेश भातांब्रे, बालरोग तज्ज्ञ, उदगीर. 

शहरात निर्माण होणाऱ्या प्रदूषणामध्ये जास्तीत जास्त प्रदूषण हे ऑटोरिक्षा चालकांमुळे होत आहे. ऑटो रिक्षा यांची तपासणी करून त्यांची मुदत संपली आहे, त्यांच्यावर कारवाई करणे आवश्‍यक आहे. तरच प्रदूषणाचा धोका कमी होणार आहे. 
- तुकाराम हसनाबादे, उदगीर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com