तरुणांमध्येही वाढतेय हृदयविकाराचे प्रमाण

youth heart attack
youth heart attack

बीड - वयाची पन्नाशी पूर्ण झाल्यास हृदयविकार जडतो. काही वर्षांपूर्वी हृदयविकाराचा तीव्र धक्का आलेल्यांचे वय साधारण पन्नाशी पार असत. मात्र, अलीकडे बदलती जीवनशैली, धावपळीचे युग आणि त्यामुळे होणारा ताणतणाव या कारणांनी आता वयाच्या पंचविशीतही हृदयविकाराचा धक्का येऊ शकतो. त्यात या विकाराच्या कारणाला फास्ट फूड संस्कृतीही कारणीभूत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

अंबाजोगाईत मागच्या या आठवडाभरात तिघांचे हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. यामधील दोघांचा ऐन तारुण्यात मृत्यू झाला. तर तिसरी व्यक्तीही चाळिशीतीलच आहे. या घटनांमुळे तरुणांमधील हृदविकार आणि त्याची कारणे हे मुद्दे पुन्हा ऐरणीवर आले आहेत. त्यामुळे नियमित व्यायाम, वेळेवर जेवण, फास्ट फूड टाळणे, ताण-तणाव मुक्तीसाठी मन:शांती याकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे. 

सोमवारी (ता. २३) रश्‍मी देविदासराव पंचादेवी (वय २४) या बॅंकेत नोकरी करणाऱ्या तरुणीचे हृदयविकाराने निधन झाले. गेल्याच आठवड्यात सदाशिव देवनाथ दहिफळे (वय ३३) या तरुण कार्यकर्त्याचाही हृदयविकाराच्या धक्‍क्‍यानेच मृत्यू झाला. याच दरम्यान नितीन मनोहरराव काळम (वय ३९) यांचेही हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. या घटनांमुळे हृदयविकाराने आता तरुणांमध्येही शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे.

धावपळीच्या युगात तरुणांच्या मनात काही तरी मिळविण्याची आणि जिंकण्याची जिद्द असते. यातूनच सर्व जीवनशैली बदलत आहे. व्यायाम कमी आणि खाण्यात बदल ही हृदयविकाराची मुख्य कारणे आहेत. नियमित व्यायाम, पालेभाज्यांचा वापर वाढवून तणावमुक्त राहावे. 
- डॉ. रोहित तोष्णीवाल, हृदयरोगतज्ज्ञ, बीड

हृदयविकाराची कारणे
दुचाकी व इतर वाहनांमुळे चालण्याचे कमी झालेले प्रमाण. 
यंत्रणांमुळे मेहनतीची कमी झालेली कामे
खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमुळे दिनक्रमांत झालेला बदल. 
कधी रात्रपाळी, तर कधी दिवसपाळीचे काम.
जेवणाऐवजी फास्ट फूडचा वाढलेला वापर.
एकाच ठिकाणी बसून कामांमुळे शरीराची 
मंदावलेली हालचाल.
दगदग आणि धावपळीमुळे मानसिक ताण.

हृदयविकार टाळण्यासाठी आवश्‍यक बाबी
नियमित व्यायाम आणि किमान 
अर्धा तास चालणे.
खाण्यात फास्ट फूड टाळणे
स्निग्ध पदार्थांचा वापर टाळून कच्च्या भाज्यांचा वापर वाढविणे. 
मोसमी फळांचा खाण्यात वापर वाढविणे.
शरीराच्या वजनावर नियंत्रण ठेवणे.
पुरेशी झोप आणि झोपेची निश्‍चित वेळ ठेवणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com