esakal | विदर्भात परीक्षेसाठी जाणाऱ्या उमेदवारांसाठी परभणी महामंडळ सोडणार स्वतंत्र बस

बोलून बातमी शोधा

file photo}

आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या मागणीनंतर प्रशासनाचा निर्णय 

विदर्भात परीक्षेसाठी जाणाऱ्या उमेदवारांसाठी परभणी महामंडळ सोडणार स्वतंत्र बस
sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर विदर्भातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवासी वाहतुकीवर परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी प्रतिबंध लावला आहे. परंतु, विदर्भात आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेसाठी लेखी परीक्षा होत आहेत. मात्र, या परीक्षेस उमेदवार मुकु नये म्हणून परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे उमेदवारांसाठी स्वतंत्र प्रवासी बसची व्यवस्था व्हावी, अशी मागणी केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात लागलीच निर्णय घेऊन एसटी महामंडळाला स्वतंत्र बस सोडण्याचे निर्देश दिले. त्यानुसार परभणी आगारातून शनिवारी (ता. २७) सकाळी आणि त्यानंतर सायंकाळच्या वेळी परिक्षार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडण्यात आल्या असल्याची माहिती आगारप्रमुख दयानंद पाटील यांनी दिली.

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या शासनाकडून आरोग्य विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी ता.28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये उमेदवारांच्या परीक्षा होणार आहेत. याच प्रमाणे विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ व इतर जिल्ह्यामध्ये देखील या परीक्षा होत असून, परभणीतील उमेदवारांची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आसन व्यवस्था (परीक्षा केंद्र) करण्यात आली आहे.

हेही वाचामाहूर, किनवटकरांची ‘बत्ती गुल’च्या त्रासापासून सुटका

परंतु, परभणी जिल्हा प्रशासनाने विदर्भातून 'कोरोना' चा संसर्ग परभणीत येऊ नये, यासाठी विदर्भात जाणाऱ्या आणि तिकडून येणाऱ्या प्रवासी वाहतुकीवर प्रतिबंध लावला आहे. या पार्श्वभूमीवर परभणीच्या एसटी महामंडळाने विदर्भाततील 11 जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या एसटी बसेस थांबवल्या आहेत. ज्यामुळे या उमेदवारांची प्रचंड हेळसांड होत आहे. आधीच आरोग्य विभागात मनुष्यबळाची कमतरता असून,  सदर उमेदवारांना देखील नोकरीची संधी उपलब्ध व्हावी,  या दोनही बाबी पाहता, एसटी महामंडळाने विदर्भात जाणाऱ्या बसेस 27 फेब्रुवारी रोजी पाठवाव्यात. तसेच परतीत 28 फेब्रुवारी रोजी तेथून सायंकाळी परभणीकडे वापस आणाव्यात. यासाठी आपल्या स्तरावर परवानगी द्यावी.

महत्त्वाचे म्हणजे या प्रवासी वाहतुकीत आरोग्य विभागाच्या परीक्षा देणार्या् उमेदवारांना प्राधान्य द्यावे, आमदार डॉ.राहुल पाटील यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर तसेच परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांच्याकडे शुक्रवारी सायंकाळी केली होती. त्यानंतर लागली जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातील आदेश काढले. परिवहन राज्य महामंडळ आला न केलेल्या आदेशात त्यांनी उद्या 28 रोजी विदर्भात जाणाऱ्या परीक्षा त्यांसाठी सूट देण्यात यावी असे निर्देश त्यांनी दिले. त्यानंतर लागलीच परभणीचे आगारप्रमुख दयानंद पाटील यांनी शनिवारी सकाळी आठ वाजता अमरावती नागपूर साठी रात्री सात ते आठच्या दरम्यान देखील नागपूर अमरावती कडे जाणाऱ्या बसेस सोडल्या जाते, अशी माहिती दिली आहे दरम्यान परीक्षार्थींनी आपले आसन व्यवस्था राखीव करून घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.

संपादन - प्रल्हाद कांबळे