इंडिया पोस्ट बँकेचे पसरले जाळे

indianpost
indianpost

लातूर : बँकेच्या सुविधा खेडोपाडी घेऊन जाता याव्यात म्हणून टपाल विभागातर्फे सुरू करण्यात अालेल्या ‘इंडिया पोस्ट पेमेंटस बॅंके’चे जाळे जिल्ह्यांत सर्वत्र पसरण्यास सुरवात झाली आहे. गेल्या तीन महिन्यात बँकेचे जिल्ह्यात 30 उपकेंद्र आणि 181 शाखा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांना आता आपल्या गावातच बँकेचे सर्व व्यवहार करणे सोपे झाले आहे. विशेष म्हणजे, वेगवेगळी आॅनलाईन बिलेही भरण्याची सुविधाही प्राप्त झाली आहे.

देशातील 650 टपाल कार्यालयात एकाचवेळी ‘इंडिया पोस्ट पेमेंटस बॅंके’ची सुरवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 सप्टेंबर रोजी करण्यात आली. त्यात लातुरमधील टपाल कार्यालयाचाही समावेश होता. त्यावेळी लातुरमध्ये एक मुख्य शाखा आणि टिळक नगरमधील टपाल कार्यालय, हरंगूळ, गंगापूर, बोरी या चार शाखांचा समावेश होता. त्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीत या बँकेच्या शाखा 181 पर्यंत पोचल्या आहेत. तर जिल्ह्यातील टपाल कार्यालयात 30 उपकेंद्रही सुरू करण्यात आले आहे. यासाठी त्या-त्या टपाल कार्यालयातील कर्मचाऱ्यांना स्मार्ट फोन, थंब इंप्रेशन मशिन असे साहित्यही केंद्र सरकारतर्फे देण्यात आले आहे.

लातुरमधील टपाल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात लातूर आणि उस्मानाबाद हे दोन जिल्हे येतात. लातुरप्रमाणेच उस्मानाबादमध्येही ‘इंडिया पोस्ट पेमेंटस बॅंके’चे जाळे पसरत आहे. गेल्या तीन महिन्यांत उस्मानाबादमध्ये 28 उपकेंद्र आणि 177 शाखा सुरू झाल्या आहेत. लातुरमधील अहमदपूर वगळता सर्व तालुक्याच्या ठिकाणी ही सेवा सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत तांत्रिक अडचणी दूर करून अहमदपूरसह आणखी 70 ठिकाणी ही सुविधा सुरू होणार आहे. यामुळे नागरिकांना आपल्या भागातच बँकेचे व्यवहार करणे अधिक सोपे होणार आहे. पैसे दुसऱ्या खात्यावर पाठविणे, वीजबिल-केबल बिल अशा वेगवेगळ्या बिलांचा ऑनलाइन भरणा करता येणार आहे. या सुविधेला सध्या नागरिकांमधून उत्तम प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती डाकघर अधिक्षक ए. के. धनवडे यांनी ‘सकाळ’ दिली.

खातेधारकांची संख्या
लातूर : तीन हजार 383
उस्मानाबाद : दोन हजार 581

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com