भारतीय विद्यार्थी अडकले किर्गिझस्तानात 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 March 2020

वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले जालना, औरंगाबादसह राज्यातील अनेक विद्यार्थी मध्य आशिया खंडातील किर्गिझस्तानात अडकले आहे. सरकारने त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी त्यांच्या पालकांकडून होत आहे. 

जालना - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी देशातील विमान सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले जालना, औरंगाबादसह राज्यातील अनेक विद्यार्थी मध्य आशिया खंडातील किर्गिझस्तानात अडकले आहे. सरकारने त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी त्यांच्या पालकांकडून होत आहे. 

जगभरात कोरोना विषाणूंचा प्रसार झाला आहे. आशिया खंडातील किर्गिझस्तानात या देशातही या विषाणूची लागण झाल्याने लॉकडाऊन करण्यात आल्याचे अडकलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

किर्गिझस्तानच्या बिश्केक राजधानीतील जलालाबाद शहरात राज्यातील अनेक विद्यार्थी जून २०१९ मध्ये स्टेट मेडिकल यूनिवर्सिटीत एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेलेले आहे. या देशातही कोरोनाचा फैलाव झाल्याने विद्यार्थ्यांना सहा महिन्याच्या सुट्या देण्यात आल्या आहे. मात्र, विमान सेवा बंद करण्यात आल्याने हे विद्याथी अडकले आहे.

हेही वाचा :  चाळीस किलोमीटर पायपीट करून गाठले बदनापूर 

यात भोकरदन तालुक्यातील धावडा येथील तोहित खान व औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगावमधील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. याबाबत केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे तोहीत व अन्य विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याची मागणी केली आहे  आपल्या मुलांशी संपर्क होत नसल्याने पालकांची चिंता वाढली असून भारत सरकारने या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी तोहित खानचे वडील नईम खान यांनी केली आहे. 

माझा मुलगा किर्गिझस्तान मध्ये जलालाबाद शहरातील स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीत दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. त्याच्यासह अनेक विद्यार्थी तिथे अडकून पडले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांना परत आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे. 
डॉ. नईम खान, पालक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian students in Kyrgyzstan