सोयगावचे इंद्रजित खस यांना राष्ट्रपतींचे निमंत्रण   

Indias President Ramnath Kovinds invitation to Soygaons Indrajit Khas
Indias President Ramnath Kovinds invitation to Soygaons Indrajit Khas

औरंगाबाद : आपल्या नवप्रयोगाच्या माध्यमातून नवनिर्मिती व संशोधन करणाऱ्या देशातील नवप्रवर्तकांनी अहमदाबाद येथील प्रदर्शनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगावचे हळद व अद्रक लागवड यंत्र तयार करणारे इंद्रजित खस यांचाही समावेश होता. त्यांच्यासह 11 जणांना 20 व 21 मार्चला विशेष पाहुणे म्हणून राष्ट्रपती भवनाकडून निमंत्रण मिळाले आहे. शिवाय राष्ट्रपतींनी या प्रवर्तकांच्या कार्याचे कौतुक केले. 

अहमदाबाद येथे राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठानतर्फे अहमदाबाद राष्ट्रीय प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यात देशभरातील नवे प्रयोग मांडण्यात येतात. यातून नवप्रवर्तकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते. या प्रदर्शनाचे शुक्रवारी राष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन झाले. यात इनोव्हेटरपैकी मोजक्‍या 11 जणांना राष्ट्रपतींच्या निवासस्थानी दोन दिवसांसाठी 20 व 21 मार्चला विशेष पाहुणे म्हणून बोलावले. यात सोयगावच्या श्री. खस यांचा समावेश आहे. सोमवारी (ता. 18) दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. 

  • संशोधनाने दिली ओळख -

सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील सोयगावात एका छोट्याशा वेल्डिंग मशीनच्या दुकानात इंद्रजितने हळद, अद्रक लागवडीचे यंत्र तयार केले. आज या यंत्राला देशभरासह विदेशातूनही मागणी आहे. बांगलादेशात पाच यंत्र थेट सोयगावहून निर्यात करण्यात आले. याच यंत्रामुळे इंद्रजित यांना अभिनेता अक्षय कुमार यांनीही पाच लाख रुपयांची यंत्राच्या कामगिरीबद्दल बक्षीस दिले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com