लातूरच्या दुष्काळमुक्तीसाठी इंद्रप्रस्थ जलभूमि अभियान

Indraprastha Jalbhumi campaign for Laturs drought
Indraprastha Jalbhumi campaign for Laturs drought

लातूर - रेल्वेने पाणी दिल्याने लातूर जिल्ह्याची नामुष्की झाली आहे. यातून बाहेर काढण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. या पुढे जावून आता लातूरच्या दुष्काळमुक्तीसाठी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून ता. 22 मे ते 5 जून या कालावधीत इंद्रप्रस्थ जलभूमि अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान `पंचनिष्ठे`ने राबविले जाणार आहे. या करीता आक्का फाऊंडेशन पुढाकार घेत असून शासनाचेही यात सहकार्य घेतले जाणार आहे. लोकसहभागही मोठा राहणार आहे.

जिल्हा दुष्काळमुक्त करणे, शेतकऱयांच्या जीवनात अर्थक्रांती घडविणे, हिरवळीचा पट्टा निर्माण करणे, जिल्हाभर वृक्ष लागवड करणे, शेतकऱयांच्या कुटुंबियांना स्वावलंबी करणे हा उद्देश अभियानाचा आहे. याचे औपचारिक उदघाटन शुक्रवारी (ता. 11) पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जलयुक्त लातूरचे प्रमुख डॉ. अशोक कुकडे होते. पुढील तीन वर्ष हे अभियान राबविले जाणार आहे.

इंद्रप्रस्थ अभियानाची पंचनिष्ठा -

1) पाणी पुनर्भरण खड्डा - जिल्ह्यात चार लाख 37 हजार घरे आहेत. तीन वर्षात प्रत्येक घरी पाणी पुनर्भरण खड्डा घेण्यात येणार आहे. पावसाचा प्रत्येक थेंब छताच्या माध्यमातून पाईपद्वारे भूमिगत खड्डायत पोहचविण्यात येणार आहे.

2) विहिरींचे पुनर्भरण - जिल्ह्यात ग्रामीण भागात सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या 25 हजार विहिरी व 9 हजार हातपंपाचे  पुनर्भरण करून भूजलाच्या स्थितीत वाढ करणे.

3) बोअरवेलचे पुनर्भरण करणे - जिल्ह्यात एक लाख 27 हजार विंधनविहिरी (बोअर) आहेत. या सर्व विंधनविहिरीचे पुनर्भरण करून पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न करणे.

4) घरोघरी शोषखड्डा करणे -  अभियानात घरा घरातील दुषित व सांडपाणी या शोषखड्डयात जिरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याकरीता प्रत्येक घरासमोर शोषखड्डा तयार केला जाणार आहे.

5) घर तिथे झाड अभियान - जमिनीची धूप थांबविण्य़ासाठी झाड लावण्याची गरज आहे. या अभियानात प्रत्येक घरासमोर झाड लावले जाणार आहे. 

टंचाईच्या काळात आपण एकत्र येवून जलयुक्त शिवार यशस्वी करु शकतो हे दाखवून दिले आहे. आता जिल्ह्याला पाणीदार बनवायचे आहे. यातून हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाची लोक चळवळ व्हावी ही अपेक्षा आहे. या करीता लोकसहभाग महत्वाचा आहे. या करीता जलयोद्धा स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. जलयुक्त शिवार ते जलयुक्त वावर असे हे अभियान आहे. पाणी पुनर्भरण खड्डा, विहीरींचे पुनर्भरण, बोअरचे पुनर्भरण,शोषखड्डे, घर तिथे झा़ड या पंचनिष्ठेने हे अभियान पूर्णत्वास नेले जाणार आहे. - संभाजी पाटील निलंगेकर, पालकमंत्री, लातूर

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com