पाच हजाराची लाच घेताना उद्योग निरीक्षक बीडमध्ये जाळ्यात

bribe
bribe

बीड : पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना उद्योग निरीक्षकास रंगेहाथ पकडल्याची घटना सोमवारी (ता. 8) सकाळी जिल्हा उद्योग केंद्रात घडली. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत स्कूलबस घेण्यासाठी बीज भांडवल योजनेच्या प्रस्तावाला मंजूरी देऊन बँकेला शिफारस करण्यासाठी लाच घेताना उद्योग निरिक्षक शरद नारायण राठोड याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाने बीज भांडवल योजनेतून कर्ज मिळावे यासाठीचा प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्रात दाखल केला. सदर प्रस्ताव मंजूर करुन कर्जासाठी बँकेला शिफारस करावी यासाठी बेरोजगार तरुण चकरा मारत होता. मात्र, येथील उद्योग निरीक्षक शरद राठोड याने या सुशिक्षित बेरोजगाराकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. बेरोजगार तरुणाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेला तक्रार दिली.

तक्रारीची खातरजमा केल्यानंतर सोमवारी जिल्हा उद्योग केंद्राच्या कार्यालय परिसरात सापळा रचला. यावेळी शरद राठोड याला पाच हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्यावर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com