पात्रुडमध्ये नालीत आढळले जिवंत अर्भक ; रूग्णालयात उपचार सुरु

पांडुरंग उगले
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

माजलगाव (जि. बीड) : पात्रुड येथे शनिवारी (ता. १७) रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान एका नालीमध्ये पडलेल्या अवस्थेत पुरूष जातीचे अर्भक आढळले. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती देऊन माजलगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून, अर्भकाची प्रकृती ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

पात्रुड येथे शनिवारी (ता.१७) रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान नुराणी चौकातील सांडपाणी वाहून नेणार्‍या नालीतून लहान मुलांचा रडण्याचा आवाज येत असल्याचे स्थानिक नागरिकांना ऐकावयास आला. नालीमध्ये पाहिले असता पुरूष जातीचे नवजात अर्भक असल्याचे दिसून आले.

गावातील सामाजिक कार्यकर्ते शेख तौफीक, जफर कुरेशी यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिर्झा वाहब बेग यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून घटनेची सर्व हकिगत सांगून अर्भकास तात्काळ ममाजलगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी तपासणी करून अर्भकाची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगितले. अर्भकाचे वजन 3 किलो असून नालीमध्ये आढळलेल्या अर्भकाची नाळ तोडलेली नसल्याने ते एक दिवसाचेच असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावर पोलिस उपनिरीक्षक एस.डी.नरके, पोलिस नाईक राजेंद्र ससाणे, बापु मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

पात्रुड येथे पुरूष जातीचे अर्भक सापडल्याची माहिती स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांना कळाली. यावर त्यांनी रूग्णालय गाठत अर्भकाची पालकत्व स्विकारण्याची भावना पोलिस निरीक्षक मिर्झा वाहब बेग यांच्याकडे व्यक्त केली. दरम्यान, बीड येथील चाईल्ड लाईन या संस्थेच्या प्रतिनिधींनी भेट दिली. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 अनेक महिलांनी दिली मायेची उब

एका दिवसाच्या अर्भकाला ग्रामीण रुग्णालयात आणले असता तेथील अनेक महिलांनी पुढे येत या, नवजात अर्भकास मायेची उब दिली. 

Web Title: Infant found in the trunk The treatment started in the hospital