या नाल्यात आढळले अर्भक

गणेश पांडे
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

परभणी : परभणी शहरातील डिग्गी नाल्यात एक नवजात पुरुष जातीचे अर्भक मृत अवस्थेत आढलेले. ही घटना शनिवारी (ता.नऊ) सकाळी अकरा वाजता उघडकीस आली. दरम्यान, या बाळाला कोणी फेकले? याचा शोध पोलिस घेत आहेत. 

परभणी : परभणी शहरातील डिग्गी नाल्यात एक नवजात पुरुष जातीचे अर्भक मृत अवस्थेत आढलेले. ही घटना शनिवारी (ता.नऊ) सकाळी अकरा वाजता उघडकीस आली. दरम्यान, या बाळाला कोणी फेकले? याचा शोध पोलिस घेत आहेत. 

 
परभणी शहरातील हॉटेल निरज समोरून वाहणाऱ्या डिग्गी नाल्यात सकाळी अकरा वाजता एक नवजात पुरुष जातीचे अर्भक फेकल्याचे या भागातील नागरीकांना दिसले. त्यांनी तातडीने याची माहिती नानलपेठ पोलिसांना दिली. पोलिसांच्या पथकाने तातडीने या ठिकाणी भेट देवून पाहणी केली. हे अर्भक पाण्याच्या प्रवाहाने वाहून आले असावे की, याच भागातील कुणी या बाळाला फेकले असावे ? बाळाला नाल्यात फेकतांना ते जिवंत होते की मृत होते याची देखील माहिती पोलिस घेत आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यामुळे लोकांनी या नाल्याभोवती गर्दी केली होती. दरम्यान, या घटनेची नोंद नानलपेठ पोलिस ठाण्यात घेण्यात आली आहे. घटनास्थळास सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, पोलिस निरीक्षक कुंदन वाघमारे यांच्यासह इतरांनी भेटी दिल्या.

त्यांनाही आश्रु अनावर....
घटनेची माहिती मिळाल्यानंतर नानलपेठ पोलिसांचे पथक या ठिकाणी दाखल झाले. या पथकात एक महिला अधिकारी व कर्मचारी होत्या. नवजात अर्भकाला अश्या अवस्थेत पाहून महिला पोलिस कर्मचाऱ्याला आश्रू अनावर झाले. परंतू प्रसंगावधान राखून त्यांनी पुढील कारवाई पूर्ण केली.

हे ही वाचा....

वैद्यकीय व्यावसायीकाला
दोन लाखाला गंडविले
...
ऑनलाईन फसवणूकप्रकरणी परभणीत गुन्हा
.
परभणी : तुमच्या खात्यातील पैसे रिझर्व्ह बॅंकेत जमा केले जाईल, अशी बातवणी करून एका वैद्यकीय व्यावसायीकाला दोन लाख रुपयांला गंडविल्याची घटना शहरातील कालाबावर परिसरात गुरुवारी (ता.सात) घडली. या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. मोहम्मद अलीम अब्दुल रहीम यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. ता.१४ ऑक्टोबर रोजी ते औरंगाबाद येथे बैठकीस गेले होते. सकाळी साडे आकरा वाजेच्या सुमारास त्यांना फोन आला. समोरच्या व्यक्तीने खात्याची माहिती मागितली. बैठकीत असल्याने फिर्यादीला जास्त बोलता आले नाही. त्यानंतर पुन्हा डॉ. मोहम्मद अलीम यांना फोन आला. बॅंकेतून बोलत आहे. तुमचा पैसा आरबीआय मध्ये जाईल. असे सांगत समोरच्या व्यक्तीने ओटीपी क्रमांक मागितला.

त्यामुळे घाबरलेल्या डॉक्टरांनी समोरच्या व्यक्तीला ओटीपी क्रमांक दिल्यानंतर त्यांच्या खात्यातून दोन लाख रूपये तातडीने काढण्यात आले. फसवणुक झाल्याचे समजतात डॉ. मोहम्मद अलीम यांनी ग्राहकसेवा केंद्राला फोन करून माहिती दिली. तसेच डेबीट कार्ड आणि बॅंक खाते ब्लॉक केले. फसवणुक प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास औरंगाबाद पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infants found in this drain