मराठवाड्यात सोयाबीनवर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

परभणी - मराठवाड्यात कपाशीपाठोपाठ आता सोयाबीन पिकावर अळीचे संकट ओढावले आहे. शेंगा लागण्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीनवर पाने खाणाऱ्या अळ्यांसह करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून वेळीच फवारणी करण्याचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने दिला आहे.

परभणी - मराठवाड्यात कपाशीपाठोपाठ आता सोयाबीन पिकावर अळीचे संकट ओढावले आहे. शेंगा लागण्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीनवर पाने खाणाऱ्या अळ्यांसह करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून वेळीच फवारणी करण्याचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने दिला आहे.

मराठवाड्यातील प्रमुख नगदी आणि सर्वाधीक पेरा असलेल्या सोयाबीन चांगल्या अवस्थेत आहे. मध्यतंरी पावसाच्या खंडामुळे सोयाबीन करपुन जात होते. मात्र मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन चांगलेच खुलले आहे. सध्या सर्वत्र सोयाबीन शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. परंतु सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही अळी पाने कुरतुड आपली उपजिवीका साधते.तसेच काही दिवसात शेंग मोठी होताच त्यावर देखील हल्ला करते.त्यामुळे या अळीचा वेळीच बंदोबस्त करुन नुकसान टाळण्याचा सल्ला कृषि विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ.यू.एन.आळसे व प्रा. डी.डी.पटाईत यांनी दिला आहे.

अशा करा उपाययोजना
क्लोरॅट्रानिलीप्रोल १८. टक्के (६० मिली) -  इंडाक्झाकार्ब १५.टक्के (१४० मिली)- किंवा स्पाइनेटोरॅम ११.टक्के (१८० मिली)-किंवा थायमिथोक्झाम १२.६ टक्के अधिक  लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.३टक्के (५० मिली) किटकनाशकाचे प्रमाण हे सर्व प्रकारच्या फवारणी पंपाकरिता असुन एकूण प्रमाण प्रती एकर याप्रमाणेच वापरावे. यापैकी कुठलेही एकच किटकनाशक फवारावे. काही दिवसांपूर्वी झालेल्या मोठ्या पावसामुळे सोयाबीनवर शेंगा करपा व  चारकोल  रॉट दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या रोगांचा प्रसार होऊ नये म्हणून कार्बेन्डेझिम १२ टक्के अधिक मॅन्कोझेब ६३ टक्के  या संयुक्त बुरशीनाशकाची २०० ग्रॅम प्रति एकरी याप्रमाणे फवारणी करावी.

Web Title: Influence of larvae of eating plants in Marathwada