ग्रामपंचायतीकडून लिंकद्वारे माहिती संकलन 

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

घनसावंगी (जि.जालना) -  अंतरवाली टेंभी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने कोरोना संसर्गाच्या बचाव करण्यासाठी गावपातळीवर ग्रामस्थांची आरोग्यविषयक माहितीसाठी सर्व्हे लिंक तयार करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना बसून मोबाईलवर या लिंकद्वारे माहिती भरता येत आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात येत आहे. प्रशासनाच्या वतीने गावपातळीवर अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्यामार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून बाहेरगावाहून आलेल्यांबरोबर गावातील ग्रामस्थांकडून त्यांना असलेल्या आजाराबरोबर इतर माहिती भरून घेण्यात येत आहे. त्याचबरोबर अनेक ग्रामपंचायतींतर्फे कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचावाबाबत माहिती देणारे फलक गावोगावी लावून जनजागृती करण्यात येत आहे.

आजच्या संगणक व मोबाईल क्रांतीच्या युगात प्रत्येकाकडून मोबाईल व त्यातच स्मार्ट मोबाईल आला असल्याने या क्रांतीचा उपयोग करण्यासाठी अंतरवाली टेंभी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना व्हायरस सर्व्हेची गुगल फॉर्मची लिंक तयार केली आहे. त्यात गावातील नागरिकांकडून माहिती भरून घेण्यात येत आहे.

त्यासाठी मोबाईलमधून ही माहिती फक्त या लिंकवर क्‍लिक करून नमूद करता येते. त्यासाठी प्रत्येक कुटुंबाच्या प्रत्येकजणाचे फॉर्म ते भरून घेत आहेत. आरोग्य प्रशासनाच्या वतीने आशा व अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. ही लिंक पूर्ण फॉर्म भरल्यानंतर सबमीट केल्यानंतर त्यांचे रेकॉर्ड ग्रामपंचायतीच्या संगणकात डाटा जमा होत आहे. त्यामुळे अडचणीचे वाटणारे काम सोपे झाले. 

काय आहे फॉर्म 

नाव, आधार कार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक, ताप आहे का, खोकला आहे का, श्‍वास घेण्यास त्रास होत आहे का, डोकेदुखी आहे का, शिंका येत आहेत का, अशक्तपणा वाटत आहे का अशा प्रश्‍नांचा हा फॉर्म गुगल लिंकवरून भरल्यानंतर सबमीट केल्यानंतर त्यांचे रेकॉर्ड ग्रामपंचायतीच्या संगणकावर जमा होत आहे. 

कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी गावात जाहिरातींचे फलक, धूरफवारणी, स्वच्छता यांसह अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचबरोबर आजच्या मोबाईल क्रांतीचा उपयोग करून घरबसल्या फॉर्म भरून सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण फॉर्मनुसार आरोग्य विभागास कळवून त्यांच्यावर योग्य उपचारांसाठी प्रयत्न होत आहेत. 
- पंचफुला कोल्हे, 
सरपंच, अंतरवाली टेंभी 

कोरोनापासून बचाव करण्यासाठी; तसेच वैयक्तिक व गावांच्या सुरक्षेसाठी हा फॉर्म भरण्यात येत आहे. तरी ज्यांनी हे फॉर्म भरले नाहीत त्यांना फॉर्म लवकरात लवकर भरण्यासाठी विनंती करीत आहोत. त्याचबरोबर आपला फॉर्म भरून झाला की दुसऱ्यांचेही फॉर्म भरण्यास सांगण्यात येत आहे. 
- नितीन भिल्लारे, 
संगणक परिचालक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com