आता करा घरबसल्या वैद्यकीय तपासणी, केंद्र शासनाची अभिनव योजना!  

माधव इतबारे
Monday, 23 November 2020

डॉक्टरांचा मोफत घेता येणार सल्ला. 

औरंगाबाद : नागरिकांना आता घरबसल्या कुटुंबांची वैद्यकीय तपासणी तेही विनामूल्य करता येणार आहे. केंद्र शासनाच्या मदतीने राज्य सरकारने ऑनलाइन मोफत वैद्यकीय सेवा सुरू केली आहे. कोरोना संसर्गामुळे प्रत्येक जण आरोग्याविषयी जागृत झाला आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

त्यामुळे केंद्र शासनाने नागरिक वेबसाइट किंवा अँड्रॉइड अप्लिकेशनद्वारे डॉक्टरांशी घरबसल्या सल्लामसलत करू शकतात, अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी केंद्र सरकारच्या https://www.esanjeevaniopd.in/ वर किंवा अॅन्डॉईड मोबाईलधारकांनी  https://play.google.com/store/apps/details?id=in.hied.esanjeevaniopd या लिंकवर जाऊन ऍप डाउनलोड करावा. या सुविधेचा ज्येष्ठांसह नागरिकांनी फायदा घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 
अशी आहे प्रक्रिया... 

  • रुग्ण नोंदणी करण्यासाठी-पेशंट रजिस्ट्रेशन वर क्लिक करा. 
  • मोबाइल नंबर टाइप करा. त्यानंतर नोंदणीसाठी मोबाईलवर आलेला ओटीपी अप्लिकेशनमध्ये टाका. 
  • रुग्णांची सविस्तर माहिती आणि जिल्ह्याची नोंद करून, महाराष्ट्र हब सिलेक्ट करा. त्यानंतर टोकन जनरेटवर क्लिक करून पुढील प्रक्रिया सुरू करा. मोबाईल नंबर आणि टोकन नंबर टाकून तुम्ही डॉक्टरांशी ऑनलाइन संपर्क साधू शकता. 
  • व्हिडिओ आणि चॅटद्वारे कोणत्याही सामान्य आजारांबाबत डॉक्टरांचा सल्ला घेता येईल. 
  • इ-प्रिस्क्रिपशनद्वारे डॉक्टर औषधे आणि घ्यावयाची काळजी ह्याबाबत माहिती पाठवतील. 
  • डॉक्टरांमार्फत देण्यात आलेली औषधे इ-प्रिस्क्रिपशन दाखवून सरकारी दवाखान्यातून मोफत घेता येतील. 
  • सकाळी ९.३० ते दुपारी १.३० व दुपारी तीन ते सायंकाळी (रविवार वगळता) या वेळेत सेवेचा वापर करता येईल. 

(संपादन-प्रताप अवचार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: innovative scheme Central Government Now house medical checkup