'राफेल'च्या चौकशीसाठी परभणीत काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

परभणी : राफेल खरेदी गैरव्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता.27) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

परभणी : राफेल खरेदी गैरव्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता.27) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

केंद्रात सत्तेवर असणाऱ्या मोदी सरकारच्या जनता विरोधी धोरणाचा या राफेल विमान खरेदी गैरव्यवहाराबाबत निषेध करण्यासाठी गुरुवारी (ता.27) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनात माजी राज्यमंत्री डी. पी .सावंत, जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर, प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम रेंगे पाटील, हरीभाऊ शेळके, रामभाऊ घाडगे, भगवानराव वाघमारे, जयश्री खोबे, धोंडीराम चव्हाण, माजू लाला, नदीम इनामदार, पंजाबराव देशमुख, सुनिल देशमुख आदी सहभागी झाले होते.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करणयात आले. 536 कोटी रुपयांचे विमान 1600 कोटी रुपयांना का खरेदी करण्यात आले. 'एचएएल'कडून 30 हजार कोटी रुपयांचे कॉन्ट्रेक्ट का बळकावले, जवळपास एक लाख करोड रुपये 'लाईफ साइकल कॉन्ट्रेक्ट रिलायन्स' या खासगी कपंनीला दिला गेला. त्याजवळ विमान बनविण्याचा कोणताच अनुभव नाही. त्यामुळे देशाच्या सुरक्षा प्रणालीला धोका निर्माण झाला आहे. राफेलबाबत पीएसी रिपोर्ट सरकारकडे जर असेल तर तो जनतेसमोर का ठेवला जात नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये राफेल विमानाच्या किंमतीचा तपशील कॅग अहवालात लिहिला आहे आणि तो अहवाल लोक लेखा समितीत सामावून घेतला आहे. खर्गे पीएसीचे अध्यक्ष असून, त्यांनी असा कुठलाच अहवाल पाहिलेला नाही. त्यामुळे हे कसे शक्य आहे, असे प्रश्न यावेळी आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केले.

Web Title: for Inquiry of Rafale Deal Congress Started Agitation in Parbhani