नजीब कहॉं है; घोषणांनी दणाणले शहर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

बीड - दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील चार महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या नजीब अहमदचा शोध घेण्याच्या मागणीसाठी स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशनच्या वतीने सोमवारी (ता. 27) शहरातून इन्साफ मार्च काढण्यात आला. किल्ला मैदानापासून निघालेला मोर्चा जिल्हा कार्यालयावर पोचल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 

"इन्साफ दो..इन्साफ दो, नजीब को इन्साफ दो', नजीब कहॉं है', अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. जेएनयूमधील विद्यार्थी नजीब अहमद चार महिन्यांपासून बेपत्ता असूनही सरकार त्यासंदर्भात कुठलीही पावले उचलत नाही, त्याच्या अपहरणाची साधी चौकशीही केली जात नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला. अल्पसंख्याक तरुणांमध्ये भीतीचे वातावरण असून अशा प्रकारच्या एकामागून एक घटना घडत आहेत, जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या सरकारने या प्रकरणाकडे पाठ फिरवली असून दिल्ली पोलिसांनीही कोणताही पुढाकार घेतला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

Web Title: insaf march in beed