फुलंब्री येथे लघु पंप नळ कामांची पाहणी

नवनाथ इधाटे
मंगळवार, 22 मे 2018

फुलंब्री - तालुक्यातील गणोरी आणि किनगाव येथे जिल्हा परिषदेमार्फत सौर उर्जेवर आधारीत असलेला दुहेरी लघु पंप नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामांची पाहणी करण्यात आली. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवणीत कौर यांनी सोमवारी ही रोजी पाहणी करून सूचना केल्या. 

यावेळी गट विकास अधिकारी विठ्ठल हरकळ, उपसरपंच बाळासाहेब तांदळे, शाखा अभियंता आनंद मेटे, नवनाथ जाधव, कार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा श्री.घुगे, यांत्रिकी अभियंता श्री. पाटील, शाखा अभियंता श्रीकांडे यांची उपस्थिती होती. 

दरम्यान तालुक्यातील गणोरी येथील खंडी वस्ती आणि किनगाव येथील सौर उर्जेवर आधारित दुहेरी लघु पंप नळ पाणीपुरवठा योजने अंतर्गत येथील नागरिकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून 24 तास शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात आले आहे. या माध्यमातून येथील वस्तीवर सुमारे 200 नागरिकांना या ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याचा लाभ होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेने सुमारे चार लाख रुपये खर्च करून ही योजना राबवली आहे. या कामाची मुख्यकार्यकारी अधिकारी पवणीत कौर यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले.

Web Title: Inspect small pump pipe works at the fulambri