सुरक्षेच्या दृष्टीने गर्दीच्या ठिकाणी बीडीडीएसकडून गणेश मंडळांची पाहणी 

Inspection by BDDS at ganesh mandals crowded places for safety
Inspection by BDDS at ganesh mandals crowded places for safety

नांदेड : शहरात देश- विदेशातून सचखंड गुरुद्वाराचे व रेणूका माताचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यांच्या व शहराच्या सुरक्षेला काही समाजकंटकांकडून धोका पोहचु नये यासाठी महत्वाच्या व गर्दीच्या तसेच गणेश मंडळांच्या ठिकाणी बीडीडीएसकडून अाधूनिक यंत्राद्वारे तपासणी करण्यात येत आहे. 

नांदेड शहराची ओळख सचखंड गुरूद्वारामुळे जगभरात आहे. तसेच हे शहर विमान, रेल्वे आणि राष्ट्रीय मार्गाने जोडल्या गेलेेले आहे. शहराचा वाढता विस्तार व झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्या यामुळे शहर हे मोठ्या महानगरात मोडल्या जात आहे. मराठवाड्यीतल दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून पाहिल्या जाते. या ठिकाणी देश-विदेशातून हजारो भाविक दर्शनसाठी येत असतात. तसेच शहरात काही समाजकंटक शांतता बाधीत करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे प्रयत्न हाणुन पाडण्यासाठी पोलिस दल सक्षम जरी असले तरी विशेष काळजी बीडीडीएस पथकाची आहे. हे पथक दररोज आपल्या नित्यनेमाने शहरातील महत्वाच्या ठिकाणी आपल्या हिरा नावाच्या श्वानासोबत व आधुनिक यंत्राद्वारे तपासणी करतात. ज्या ठिकाणी तपासणी केली तेथे त्यांची नोंद असते. 

सध्या शहरात गणेशोत्सव सुरू असून मोठ्या संख्येने गणेश भक्तांसह महिला वर्ग गणेश दर्शन घेण्यासाठी रात्रीच्या वेळी घराबोहर पडतात. त्यांचे दर्शन भयमुक्त व्हावे यासाठी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तपासणी करीत आहे. शहरातील विमानतळ, रेल्वेस्थानक, बसस्थानक, आकाशवाणी, बीग बाजार, डी, मार्ट, चित्रपट गृहे, मुख्य बाजारपेठ, गर्दीचे व महत्वाचे गणेश मंडळ, सचखंड गुरुद्वारा यासह संवेदनशील ठिकाणांची तपासणी करण्यात येत आहे. 

नांदेड शहर हे पोलिस दप्तरी संवेदनशील म्हणून ओळखल्या जाते. या शहराच्या शांततेला गालबोट लागु नये म्हणून दिवसातून दोन वेळेस बॉम्ब शोधक व नाशक पथक शहरातील मुख्य ठिकाणी तपासणी करते. गणेशोत्सव काळात नुकताच डेमो घेण्यात आला. शहरात बेवारस वस्तुला हात न लावता जवळच्या संबंधित ठाण्यात किंवा बीडीडीएस कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक श्री. मधुसुदन अंकुशे आणि फौजदार बालासाहेब खार्डे यांनी केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com