"समाजकल्याण' उपायुक्त, तत्कालीन निरीक्षकाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

औरंगाबाद - समाजकल्याण विभागाचा उपायुक्त जितेंद्र वळवी, तत्कालीन वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक कैलास घोडके याच्याविरुद्ध मंगळवारी (ता. 27) गुन्ह्याची नोंद झाली. आश्रमशाळेतील एकूण दहा कर्मचारी, शिक्षकांना मान्यता मिळवून देण्यासाठी त्याने संस्था अध्यक्षांना दहा लाखांची लाच मागितली होती. 

बीड येथे संस्था अध्यक्षांच्या तीन आश्रमशाळा आहेत. त्यांच्या एका आश्रमशाळेत सहा शिक्षक, चार कर्मचारी यांना वैयक्तिक मान्यता नसल्याने यासंबंधीचा प्रस्ताव त्यांनी जुलै 2015 ला समाजकल्याण विभाग, औरंगाबाद यांना पाठविला होता. या प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी संस्था अध्यक्षांना वळवी व घोडके भेटले. त्या वेळी आश्रमशाळेतील सात शिक्षक, तीन चर्तुथश्रेणी कर्मचाऱ्यांना मान्यता देण्यासाठी प्रत्येकी एक लाख
असे एकूण दहा लाख रुपयांची लाच दोघांनी संस्था अध्यक्षांना मागितली; तसेच शासकीय अनुदान मंजूर करून देण्यासाठी एक लाख रुपये यातील घोडकेला पाच हजार रुपयांची विशेष रक्‍कमही त्यांनी मागितली.

याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अकरा डिसेंबरला तक्रार देण्यात आली. "लाचलुचपत'च्या पथकाने लाचेची पडताळणी केली, त्या वेळी जितेंद्र वळवी, कैलास घोडके यांनी एकूण दहा लाख साठ हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, "लाचलुचपत'चे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर यांच्या तक्रारीनुसार, दोघांवर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात
आल्याची माहिती "लाचलुचपत' विभागाकडून देण्यात आली. 

Web Title: inspector arrested