नांदेड : लाच घेताना धर्मादायचा निरीक्षक जाळ्यात 

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

शहरात राहणाऱ्या एका पुजाऱ्याची चौकशी या कार्यलयाकडे होती. त्यासाठी संबंधीत पुजारी हा या कार्यालयात खेटे मारत होता. त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांचे म्हणणे नोंदवून दिवानी न्यायाधिश (वरिष्ठ स्तर) यांच्या आदेशाची प्रत जबाबसोबत स्विकारून वरिष्ठांकडे अनुकूल अहवाल सादर करण्यासाठी लाचखोर निरीक्षक गंगाधरपंत धोंडिबाराव नांदेडकर (वय ४७) यांनी १५ हजाराची लाच मागितली.

नांदेड : येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात कार्यरत निरीक्षक गंगाधरपंत नांदेडकर हा १० हजाराची लाच घेताना जाळ्यात अडकला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता. २०) सायंकाळी पाचच्या सुमारास ही कारवाई करत त्याला रंगेहात पकडले. त्याच्याविरूध्द वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात राहणाऱ्या एका पुजाऱ्याची चौकशी या कार्यलयाकडे होती. त्यासाठी संबंधीत पुजारी हा या कार्यालयात खेटे मारत होता. त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांचे म्हणणे नोंदवून दिवानी न्यायाधिश (वरिष्ठ स्तर) यांच्या आदेशाची प्रत जबाबसोबत स्विकारून वरिष्ठांकडे अनुकूल अहवाल सादर करण्यासाठी लाचखोर निरीक्षक गंगाधरपंत धोंडिबाराव नांदेडकर (वय ४७) यांनी १५ हजाराची लाच मागितली. तडजोडअंती ती १० हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र ही लाच देऊ नय इच्छिणाऱ्या पुजारी तक्रारदाराने एसीबी कार्यालयात तक्रार दिली. यावरून पडताळणी सापळ्यातच निरीक्षक नांदेडकर हा सहाय्यक धर्मादाय आयुक्त या आपल्याच कार्यालयात १० हजाराची लाच घेताना रंगेहात सापडला.

त्याच्याकडून घेतलेली लाचही जप्त केली. हा सापळा यशस्वी करण्यासाठी पोलिस उपाधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कपील शेळके यांच्या पथकांनी परिश्रम घेतले.

Web Title: inspector arrested for take bribe in Nanded