आत्याच्या घरी जाण्याएेवजी देवाघरी गेला

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

नांदेड : आत्याकडे जातो म्हणून निघालेल्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह सावरखेडा (ता. नायगाव) तलावात तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली. ही घटना रविवारी (ता. १७) उघडकीस आली. 

नांदेड : आत्याकडे जातो म्हणून निघालेल्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह सावरखेडा (ता. नायगाव) तलावात तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली. ही घटना रविवारी (ता. १७) उघडकीस आली. 

नायगाव तालुक्यातील रुई (बु) येथील श्रीनिवास गोविंदराव शिंदे (वय १६) हा आत्याकडे जातो म्हणून शुक्रवारी (ता. १५) रोजी आई- वडिलांना सांगुन घरुन निघाला. तो आत्याकडे पोहचलाच नाही. दुसऱ्या दिवशी त्याच्या पालकानी आत्याशी संपर्क साधून श्रीनिवास आपल्याकडे आला का अशी विचारणा केली. यावेळी आत्याने तो आला नसल्याचे कळविले. मग श्रीनिवास गेला कुठे म्हणून त्याचा पालकांनी 
अन्य नातेवाईक व त्याच्या मित्रांशी संपर्क साधला. मात्र तो सापडला नाही. शेवटी त्याचे नातेवाईक धनराज ढगे यांनी कुंटूर पोलिस ठाण्यात हरवल्याची माहिती दिली.
 
तोपर्यत या भागात सगळीकडे नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्यास सुरवात केली. रविवारी (ता. १७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सावरखेडा (ता. नायगाव) शिवारात असलेल्या तलावात श्रीनिवास याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. यावेळी पोलिसांनी पंचनामा करून तलावातील मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी धनराज दादाराव ढगे (वय ३०) रा. घुंगराळा यांच्या माहितीवरून कुंटुर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक करीम पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार श्री. कुमरे करित आहेत.  
 
हेही वाचा...

दहा लाखासाठी विवाहितेचा छळ 
मुखेड ठाण्यात गुन्हा दाखल 

नांदेड : चैनीच्या वस्तु खरेदी करण्यासाठी माहेराहून दहा लाख रुपयाची मागणी करून एका विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या मंडळीवर मुखेड पोलिस ठाण्यात रविवारी (ता. १७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात असलेल्या अतनुर येथे राहणाऱ्या विवाहितेला लग्नानंतर सासरच्या मंडळीनी काही दिवस चांगले नांदवले. त्यानंतर मात्र तिचा छळ सुरू केला. चैनीच्या वस्तु खरेदी करण्यासाठी माहेराहून दहा लाख रुपये घेऊन ये म्हणून तिचा पती व सासरची अन्य मंडळी मानसिक व शारिरीक छळ करु लागली. 

एवढी मोठी रक्कम कुठून देणार म्हणून ती सासरचा त्रास सहन करु लागली. शेवटी तिने आपले माहेर मुखेड येथे येऊन राहू लागली. तरीही तिचा छळ काही केल्या कमी होत नव्हता. अखेर तिने मुखेड पोलिस ठाण्यात जाऊन सासरच्या मंडळीविरूध्द दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी संतोष भंडरवाड, पंडित भंडरवाड, श्रावण चातरवाड यांच्यासह सहा तिन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस नाईक श्री. आंबेवार करित आहेत.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Instead of going to his house, God went