प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरु

file photo
file photo

परभणी : राज्यात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया रविवार (ता.१९) पासून सुरु झाली असून शिक्षकांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी १० फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली. याबाबत ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषद रिक्त पदांची नोंद करण्याची सुचना केली आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बिंदुनामावली विभागीय आयुक्त कार्यालयाकडून अद्यावत करण्यात आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बदली प्रणालीमधील लॉगीनला रिक्त जागांची नोंद करण्याची सुविधा ता. २० ते ३१ जानेवारी या दरम्यान, देण्यात आली आहे. त्यानुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवली जाणार आहे. राज्यातील जिल्हा परिषदांमधील सर्व प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया टप्पा क्रमांक चार ता.१९ जानेवारीपासून सुरु करण्यात आला आहे. या प्रक्रियेमध्ये सर्व जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी १९ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान, ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे त्यांना अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या बदल्या या पूर्वी निश्चीत केलेल्या धोरणानुसार १० टक्के पेक्षा जास्त जागा रिक्त असल्यास त्या जिल्हा परिषदांमधून शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने बाहेर जाता येणार नाही.

जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी रिक्तपदांची टक्केवारी १० टक्के पेक्षा कमी असणे गरजेचे आहे. सदरची आंतरजिल्हा बदली संबंधीत शिक्षकांच्या नियुक्ती प्रवर्गानुसार बदलीने जाण्याच्या जिल्हा परिषदेत रिक्त पद असल्यास, त्या रिक्त पदावर बदली करण्यात येणार आहे. या अंतर्गत संबधीत शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज नव्याने भरण्याची कार्यवाही आवश्यक आहे. ट्रान्सफर प्रणालीमधील शिक्षकाच्या लॉगीनमध्ये स्वत:च्या नोकरीसंबधी महत्वाच्या तारखा, सेवेसंबधी महत्वाची माहीती तसेच एका शाळेतून दुसऱ्या शाळेत Attach-Detach होणे (Join newSchool) ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. ज्या शिक्षकांना आपली चुकलेली माहीती दुरुस्त करावयाची आहे, किंवा बदली, समायोजन वा इतर कारणाने एका शाळेतून कार्यमुक्त होऊन दुसऱ्या शाळेत रुजु झालेले असून त्याची नोंद संबधीत प्रणालीमध्ये करण्यात आलेली नाही. अशा शिक्षकांनी त्यांच्या लॉगीन मधून शिक्षणाधिकारी यांना ऑनलाईन रिक्वेस्ट करावी. शिक्षणाधिकारी लॉगीन मधून पडताळणी करण्याची सुवीधा देण्यात आलेली आहे. याबाबत ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना पत्र दिले आहे.


 शिक्षकांना मिळणार स्वत:चे लॉगीन
सर्व शिक्षकांना स्वत:चे लॉगीन उपलब्ध करुन दिले असल्याने यापुढे बदलीसाठी अर्ज भरणे अथवा कोणत्याही माहितीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी मुख्याध्यापकांच्या  लॉगीनचा वापर कररण्याची आवश्यकता नाही. याबाबत मुख्याध्यापक शिक्षकांना सुचना देणार आहेत. तसेच शिक्षकांनी अर्ज भरण्यासाठी लॉगीन आयडी म्हणून सरल प्रणालीमध्ये असलेला स्वत:चा आयडी व पासवर्ड म्हणून संगणकीय प्रणालीद्वारे डीफॉल्ट पासवर्ड नोंदवता येणार आहे. मोबाईल क्रमांकावर आलेल्या ओटीपीच्या सहाय्याने नवीन पासवर्ड तयार करता येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com